Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

288 हून अधिक जागांचे कल हाती, महायुतीचा बोलबाला! एका क्लिकमध्ये वाचा कोण कुठे आघाडीवर?

Maharashtra Election Result 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीत 288 हून अधिक जागांचे कल हाती आहेत. यात महायुतीचा बोलबाला दिसून येत आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पोस्टल मतांच्या मोजणीनंतर महायुतीची सरशी होताना दिसत आहे, अशा स्थितीत महायुती 193 तर महाविकास आघाडीचे 87 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. तर इतर 8 उमेदवारही आघाडीवर आहेत. महायुती राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Election Result 2024

कुठे कोण आघाडीवर

हिंगोली विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे तानाजी मुटकुळे 3 हजार 100 मतांनी आघाडीवर आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार संतोष बांगर 4590 मतांनी आघाडीवर आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राजू नवघरे हे 5877 मतांनी आघाडीवर आहेत.

  • कागलमध्ये टपाली मतांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आघाडीवर आहेत.
  • राधानगरी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबिटकर आघाडीवर आहेत.
  • शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीवर आहे.
  • इचलकरंजी मध्ये राहुल आवाडे आघाडीवर आहेत.
  • शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात विनय कोरे आघाडीवर आहेत.
  • कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील आघाडीवर आहेत.
  • हातकणंगले विधानसभा मतदारसंघात पहिली फेरीत जन स्वराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने 5006 मतांनी आघाडीवर आहेत.
  • सातारा शहर मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अमित कदम आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सामना होतोय.
  • पुणे शहरमधील वडगाव शेरीतून सुनील टिंगरे आघाडीवर आहेत.
  • वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून सुनील टिंगरे 800 मतांनी आघाडीवर आहेत.
  • कसबा मतदासंघातून हेमंत रासने आघाडीवर आहेत.
  • हडपसर मतदासंघातून चेतन तुपे आघाडीवर आहेत.
  • कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत.

नाशिक जिल्हा अपडेट्स

  • 1. छगन भुजबळ आघाडीवर, तिसऱ्या फेरी अखेरीस छगन भुजबळ यांनी घेतली 86 मतांनी आघाडी2. नांदगाव मध्ये सुहास कांदे आघाडीवर
  • 3. पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे आघाडीवर
  • 4. देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे आघाडीवर
  • 5. मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे आघाडीवर
  • 6. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले आघाडीवर
  • 7. मालेगाव मध्ये दादा भुसे आघाडीवर
  • 8. इगतपुरीत हिरामण खोसकर आघाडीवर
  • 9. दिंडोरीतून नरहरी शिरवळ आघाडीवर
  • 10. निफाड मधून दिलीप बनकर आघाडीवर
  • 11. चांदवड मधून राहुल आहेर आघाडीवर
  • 12 मालेगाव मध्ये मधून अपक्ष असिफ शेख आघाडीवर
  • 13 बागलान मधून दिलीप बोरसे आघाडीवर
  • 14 कळवण मधून नितीन पवार आघाडीवर

धुळे जिल्ह्यातील पाचही मतदार सांगा पैकी चार मतदार संघात भाजपाची मुसंडी मारली आहे. धुळे शहरात भाजपचे अनुप अग्रवाल, शिरपूरमध्ये भाजपचे काशीराम पावरा आघाडीवर तर धुळे ग्रामीण मध्ये भाजपाचे राम भदाणे आघाडीवर शिंदखेडा मतदारसंघात भाजपाचे विजयकुमार रावळ आघाडीवर आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+