महायुती पुन्हा सत्तेत! मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंन स्पष्टच सांगितलं! वाचा काय म्हणाले सीएम
Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेचा कौल समजला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकालाचे कल समजल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. पुढचा मुख्यमंत्री कोण, हा पहिलाच प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपले मत स्पष्ट केले.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार
सकाळी आठ वाजेपासून महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी बारावाजेपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, हे स्पष्ट झाले. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांसमोर आले. त्यांनी जनतेचे आभार मानत शुभेच्छा दिल्या.
मुख्यंमंत्री कोण होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आपले मत स्पष्ट केले. ते म्हणाले, निकालानंतर महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसतील. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची बैठक होईल. त्यानंतर मुख्यमंत्रीपद व इतर मुद्यांवर चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांनी अडीच वर्षे फक्त आरोप केले. आम्ही फक्त काम केले. आमच्या कामावर आम्ही जनतेसमोर गेलो. जनतेला काम करणारे सरकार लागते. त्यामुळे त्यांनी आम्हाला पुन्हा संधी दिली.












Click it and Unblock the Notifications