Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सुरुवातीच्या निकालात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे दिग्गज पिछाडीवर MIM 1 जागी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली असून त्यामध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, लातूरचे दोन्ही देशमुख बंधू हे पिछाडीवर असल्याचं दिसून येतं आहे.

काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर आहेत ही आकडेवारी सकाळी 9.55 वाजताची असून त्यामध्ये पुढे बदल होण्याची शक्यता आहे. कराड दक्षिणमधून लढत असलेले पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. त्या ठिकाणी भाजपचे अतुल भोसले आघाडीवर आहेत. संगमनेरमध्ये सर्वात धक्कादायक बातमी येण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे.

Maharashtra Election Result 2024

लातूरमध्ये देशमुख बंधू पिछाडीवर

लातूर शहरमधून लढत असलेले अमित देशमुख हे पिछाडीवर आहेत. त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर या आघाडीवर आहेत. तर लातूर ग्रामीणमधून धिरज देशमुख हे पिछाडीवर आहेत. तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर या पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

खताळ आघाडीवर, थोरात पिछाडीवर

संगमनेर या मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत. थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तित स्थान दिले जाते. याच कारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालेच तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात आहेत. मात्र मतमोजणीच्या पहिल्याच कलात बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर गेले आहेत.

औरंगाबाद पूर्व मतदार संघात इम्तियाज जलील आघाडीवर

चौथ्या फेरीनंतर महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना 756 , महाविकास आघाडीचे उमेदवार लघु साळवे यांना 764 आणि इम्तियाज जलील एमआयएम चे उमेदवार यांना 32 हजार 891 मत पडलेले आहेत जलील 30 हजार 657 मतांनी आघाडीवर आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+