Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काकांना पुतण्या भारी..! अजित पवारांनी करुनच दाखवलं, नेमकी कशी झाली 'त्या' 37 जागांवर लढाई

Maharashtra Assembly Election Results 2024- राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचे निकाल आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्राथमिक निकालानुसार महायुतीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत मिळाले असून, भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे एक्झिट पोलमध्ये कुठेही आघाडीवर नसलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत शरद पवारांच्या तुतारीला धक्का दिला आहे. लोकसभेला अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता, मात्र आता विधानसभेला अजित पवारांनी काकांवर मात केलेली दिसत आहे. विधानसभेच्या रणसंग्रामात अजित पवार यांनी शरद पवारांवर मात केल्याचे दिसत आहे.

Sharad Pawar  Ajit Pawar

37 मतदारसंघात झाला सामना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं. पक्षाचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले. 40 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली. हीच गोष्ट शरद पवारांसह त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे या लढाईत अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना धूळ चारण्यासाठी शरद पवारांनी प्रचारातून जंगजंग पछाडलं. जवळपास 37 जागांवर शरद पवार आणि अजित पवार यांचे उमेदवार समोरासमोर उभे होते. मात्र पुतण्याने काकांना चांगलीच मात दिल्याचं समोर येऊ लागलं आहे.

शरद पवारांचा करिश्मा पडला फिका

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्यासमोर नव्याने पक्ष बांधणीचे मोठे आव्हान होते. तुतारी हे नवे चिन्ह घेऊन शरद पवार मैदानात उतरले. लोकसभेला अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी 8 उमेदवार निवडून आणले. लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला. मात्र विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पिछाडी झाल्याचे दिसली. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला 19 ते 20 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या पक्षाला 36 च्या वर जागा मिळताना दिसत आहेत. अजित पवार स्वतः बारामतीतून विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवारचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

कशा झाल्या लढती?

तुमसर - चरण वाघमारे (शरद पवार गट) विरुद्ध राजू कारेमोरे (अजितद पवार गट)
अहेरी - भाग्यश्री आत्राम (शरद पवार गट) विरुद्ध धर्मराव बाबा आत्राम (अजित पवार गट)
पुसद - शरद मैंद (शरद पवार गट) विरुद्ध इंद्रनील नाईक (अजित पवार गट
वसमत - जयप्रकाश दांडेगावकर (शरद पवार गट) विरुद्ध चंद्रकांत (राजू) नवघरे (अजित पवार गट)
येवला - माणिकराव शिंदे (शरद पवार गट) विरुद्ध छगन भुजबळ (अजित पवार गट)
सिन्नर - उदय सांगले (शरद पवार गट) विरुद्ध माणिकराव कोकाटे (अजित पवार गट)
दिंडोरी - सुनीता चारोसकर (शरद पवार गट) विरुद्ध नरहरी झिरवळ (अजित पवार गट)
शहापूर - पांडुरंग बरोरा (शरद पवार गट) दौलत दरोडा (अजित पवार गट)
मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट) विरुद्ध नजीब मुल्ला (अजित पवार गट)
अणुशक्तीनगर - फहाद अहमद (शरद पवार गट) विरुद्ध सना मलिक (अजित पवार गट)
श्रीवर्धन - अनिल नवगणे (शरद पवार गट) विरुद्ध अदिती तटकरे (अजित पवार गट)
जुन्नर - सत्यशील शेरकर (शरद पवार गट) विरुद्ध अतुल बेनके (अजित पवार गट)
आंबेगाव - देवदत्त निकम (शरद पवार गट) विरुद्ध दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट)
शिरुर - अशोक पवार (शरद पवार गट) विरुद्ध ज्ञानेश्वर कटके (अजित पवार गट)
इंदापूर - हर्षवर्धन पाटील (शरद पवार गट) दत्तात्रय भरणे (अजित पवार गट)
बारामती - युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार
पिंपरी - सुलक्षणा शिलवंत (शरद पवार गट) विरुद्ध अण्णा बनसोडे (अजित पवार गट)
वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे (शरद पवार गट) विरुद्ध सुनील टिंगरे (अजित पवार गट)
हडपसर - प्रशांत जगताप (शरद पवार गट) विरुद्ध चेतन तुपे (अजित पवार गट)
अकोले - अकोले भांगरे (शरद पवार गट) विरुद्ध किरण लहामटे (अजित पवार गट)
कोपरगाव - संदीप वर्पे (शरद पवार गट) विरुद्ध आशुतोष काळे (अजित पवार गट)
पारनेर - राणी लंके (शरद पवार गट) विरुद्ध काशीनाथ दाते (अजित पवार गट)
अहमदनगर शहर - अभिषेक कळमकर (शरद पवार गट) विरुद्ध संग्राम जगताप (अजित पवार गट)
माजलगाव - मोहन जगताप (शरद पवार गट) विरुद्ध प्रकाश सोळंके (अजित पवार गट)
बीड - संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) विरुद्ध योगेश क्षीरसागर (अजित पवार गट)
परळी - राजेसाहेब देशमुख (शरद पवार गट) विरुद्ध धनंजय मुंडे (अजित पवार गट)
अहमदपूर - विनायक जाधव (शरद पवार गट) विरुद्ध बाबासाहेब पाटील (अजित पवार गट)
उदगीर - सुधाकर भालेराव (शरद पवार गट) विरुद्ध संजय बनसोडे (अजित पवार गट)
माढा - अभिजीत पाटील (शरद पवार गट) विरुद्ध मीनल साठे (अजित पवार गट)
मोहोळ - राजू खरे (शरद पवार गट) विरुद्ध यशवंत माने ( अजित पवार गट)
फलटण - दीपक चव्हाण (शरद पवार गट) विरुद्ध सचिन पाटील (अजित पवार गट)
वाई - अरुणा पिसाळ (शरद पवार गट) विरुद्ध मकरंद पाटील (अजित पवार गट)
चिपळूण - प्रशांत यादव (शरद पवार गट) विरुद्ध शेखर निकम (अजित पवार गट)
चंदगड - नंदिता बाभूळकर (शरद पवार गट) विरुद्ध राजेश पाटील (अजित पवार गट)
कागल - समरजित घाटगे (शरद पवार गट) विरुद्ध हसन मुश्रीफ (अजित पवार गट)
इस्लामपूर - जयंत पाटील (शरद पवार गट) विरुद्ध निशिकांत पाटील (अजित पवार गट)
तासगाव कवठे महाकाळ - रोहित पाटील (शरद पवार गट) विरुद्ध संजयकाका पाटील (अजित पवार गट)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+