अखेर ठरलं! मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला PM मोदी येणार, तारीख, वेळ अन् ठिकाणाचीही घोषणा
Maharashtra CM swearing-in ceremony, PM Narendra Modi will attend : मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचं उत्तर आता जवळपास मिळालं आहे. महायुतीचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव फायनल झालेले आहे. तर शपथविधीची तारीख व वेळ देखील निश्चित झाली आहे.
5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा सोहळा पार पडेल. विशेष बाब म्हणजे या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यक्रमासाठी सर्व आमदारांनी उपस्थित रहावे, अशा सूचना दिल्याचेही समजते. तसेच मुंबईबाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा, असे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री कोण होणार याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री…












Click it and Unblock the Notifications