Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरु होणार, 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

Maharashtra Budget Session 2025 : महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख आता समोर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्टिट करुन माहिती देण्यात आली आहे. या ट्टिटमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार असून दोन्ही सभागृहात दि. 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

आज विधानभवनात आयोजित विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

maharashtra budget session 2025

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. 8 मार्च सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर 13 मार्च होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले". महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे 10 मार्च रोजी विधान परिषदेत या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी दोन दिवस आणि विविध खात्यांच्या मागण्यांवर पाच दिवस चर्चा होणार आहे.

राज्यपालांच्या भाषणावर दोन दिवस होणार चर्चा

पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दोन दिवस त्यावर चर्चा होईल. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. दोन दिवसांच्या चर्चेनंतर अर्थसंकल्प मंजूर केला जाईल. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी दोन दिवस आणि विभागांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पाच दिवस असतील आणि विधिमंडळाने अधिवेशनासाठी तीन आठवड्यांचा तात्पुरता कामकाजाचा कालावधी निश्चित केला आहे.

पुरवणी मागण्या 7 मार्चला

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्या 7 मार्च रोजी मांडल्या जातील. अधिवेशनासाठी 8 आणि 9 मार्च रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 10 मार्च रोजी सादर केला जाईल. यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा सुरू होईल. दुसऱ्या आठवड्यात 14 मार्च रोजी होळीनिमित्त सुट्टी असेल. 15 आणि 16 मार्च रोजी शनिवार आणि रविवार असल्याने सुट्टी असेल. यानंतर 17 ते 21 मार्च दरम्यान वेगवेगळ्या मागण्यांवर चर्चा केली जाईल. अशाप्रकारे सभागृहाचे कामकाज 25 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे..

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+