Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोदींना स्मृतीभ्रंशाचा आजार झालाय... राहुल गांधींचा भाजपवर जोरदार प्रहार

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अमरावतीत राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला करत, धारावी प्रकल्प हा फक्त अदानीचं घर भरण्यासाठीच असल्याचा पुनरुच्चार केला. मोदींना स्मृतीभ्रंश झाल्याचा घाणाघात करत, राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

भाजपवर केले गंभीर आरोप

महाराष्ट्रातील लोकशाही सरकार पाडण्यासाठी हजारो कोटींचा वापर भाजपनं केला. हे पैसे का खर्च केले तर, मुंबईतील धारावीची जमीन आदानीला द्यायची होती. तुमचं सरकार हे खरेदी करून विकत घेतलेलं आहे, ही काय संविधानाची सुरक्षा आहे का, असा प्रतिप्रश्न करत राहुल गांधी यांनी भाजप संविधानाची हत्या करतंय असा आरोप केला. महाराष्ट्रातील गरीबांची एक लाख कोटीची जमीन भाजप आपले मित्र गौतम अदानीला देण्याचा घाट घातलाहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.

Maharashtra Assembly Elections 2024

मोदींना स्मृतीभ्रंश झालाय

नरेंद्र मोदी म्हणतात, राहुल गांधी हे आरक्षण विरोधात आहे. माझ्या बहिणीने हे भाषण ऐकलं. ती म्हणाली जे आपण बोलतोय तेच मोदी बोलत आहेत. कदाचित त्यांना स्मृतीभ्रंश झाला असावा. अमेरिकेचा एक माजी राष्ट्रपती होता. तो कधी काय बोलायचा आणि कधी काय बोलायचा. त्यावेळी त्यांना सांगावं लागायचं असं नाही, असं बोला. तसंच आपल्या पंतप्रधानांची मेमरी लॉस होत आहे. पुढच्या मिटिंगमध्ये म्हणतील महाराष्ट्रातील सरकार प्रती क्विंटल सात रुपये सोयाबीन देत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

महाविकास आघाडीला मते देण्याचे आवाहन

ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप, संघ आहे. देश संविधानाने चालला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पंतप्रधान म्हणतात संविधान हे रिकामं पुस्तक आहे. यात काही लिहिलं नाही. हे पुस्तक केवळ संघाच्या कार्यकर्त्यांसाठी रिकामं आहे. आमच्यासाठी संविधान हे देशाचा डीएनए आहे. यात आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, बुद्ध, नारायण गुरू, बसवण्णा, महात्मा गांधी यांचे विचार आहेत. हे आमच्यासाठी नवं पुस्तक नाही. हे पुस्तक वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+