उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत मारला महायुतील टोमणा, म्हणाले...

Uddhav Thackeray Press Conference- महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आज लागला. त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पराभवाच्या कारणांची मिमांसा करण्याबाबत महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही मोठे विधान केले.

Uddhav Thackeray

मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरेंच्या अपेक्षा

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, निराश होऊ नका. खचून जाऊ नका. काही लोकांचं म्हणणं आहे हा ईव्हीएमचा विजय आहे. असूही शकतो. पण जनतेला निकाल मान्य असेल तर कुणालाच काही बोलण्याची गरज नाही. मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहू. मी वचन देतो आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदाबाबतही त्यांनी मोठे विधान केले. यावेळी तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लाडक्या बहिणीबाबतही बोलले

ते म्हणाले, 'लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असेल, तर बाकीच्या गोष्टीही उघडच होत्या. सोयाबीनला भाव नाही, कापूस खरेदी नाही, महिला असुरक्षित आहेl, अशा असंख्य गोष्टी महाराष्ट्रात होत्या. आमच्या सभेला येणाऱ्या महिलांना, घर कसं चालवायचं..? हा प्रश्न होता. महागाई वाढतेय म्हणून मतदान केलं का, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी फार प्रामाणिक वागली, हे चुकलं की काय असं वाटतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

असं होईल असं वाटलं नव्हतं

ठाकरे म्हणाले, लाट उसळण्यासारखं कोणतंच काम त्यांनी केलं नव्हतं. तरी ते जिंकले. मी त्यांचं अभिनंदन करतो. आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण योजना पूर्ववत करून त्यात २१०० रुपये दर महिन्याला द्यावी, त्यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण करावी. निवडणुकीत असा जुमला करावा लागतो असं बोलू नये. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं. कोरोना काळात कुटुंबप्रमुखांप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र असं वागेल असं वाटत नाहीये. कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने मी महाराष्ट्राला मनापासून सांगितलं होतं. महाराष्ट्र असा वागेल असं काही वाटत नाही. काही तरी यात गडबड आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+