विधानसभेत घराणेशाहीतील 237 पैकी 89 जणांचा विजय; कोणत्या पक्षाने दिला घराणेशाहीला सर्वाधिक वाव!
Maharashtra Assembly Election 2024 : कोणतीही निवडणूक असो त्यात सत्ताधारी किंवा विरोधक हे एकमेकांवर घराणेशाहीवरुन जोरदार हल्लाबोल चढवतात. विशेष करुन भारतीय जनता पक्ष हा घराणेशाहीच्या विरोधात आक्रमकपणे बोलतो. कारण, भाजपात कार्यकर्ता हे बलस्थान मानले जाते. परंतु, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाराष्ट्र भाजपने सर्वाधिक तिकीट वाटप हे घराणेशाहीतील उमेदवारांनाच दिले आहेत. त्या खालोखाल कॉंग्रेसचा देखील समावेश झाला. यासंदर्भातील राजकीय अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांचा अहवाल समोर आला आहे. चला तर जाणून घेऊया, यात नेमकं काय म्हटलं आहे.
विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा मुद्दा प्रकर्षणाने समोर येतो. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचा डंका वाजताना पाहायला मिळतो. काँग्रेस असो किंवा भाजप, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना सर्वच राजकीय नेत्यांच्या वारसदार, पुढची पिढी, युवा नेते बनून राजकारणात प्रवेश करतात.

288 मतदारसंघांपैकी 237 मध्ये घराणेशाही, सर्वाधिक उमेदवार भाजपचे
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही हीच घराणेशाही प्रकर्षणाने दिसून आली. विशेष म्हणजे याबाबतीत सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, पण राज्यातील 288 मतदारसंघांपैकी, 237 मतदारसंघात घराणेशाहीतून पुढे आलेले उमेदवार उभे असल्याचं चित्र दिसून आलं. त्यामध्ये, सर्वाधिक उमेदवार हे भाजपने दिले होते. पण, दोन राष्ट्रवादी एकत्र केल्यास घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार हे पवारांच्या राष्ट्रवादीनेच उभे केल्याचं पाहायला मिळत आहे.
या कुटुंबातील पुढील पिढी राजकारणात उतरली
महाराष्ट्राचं राजकारण पाहिल्यास, पवार, ठाकरे, थोरात, देशमुख, मुंडे, शिंदे या बड्या नेत्यांनाही राजकीय वारसा किंवा त्यांचा वारसा पुढे नेणारे कुटुंबातील सदस्य असल्याचे दिसून येते. बारामतीमधील पवार कुटुंबात मोठा राजकीय वारसा असून तीन पिढ्यांपासून त्यांची घराणेशाही दिसून येते. त्याचप्रमाणे ठाकरे, मुंडे, देशमुख यांसह राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाहीचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. देशाच्या पंतप्रधान पदापासून ते सर्वच पक्षातील राजकीय नेते अनेक वेळा घराणेशाही वरून एकमेकांवर टीका करतात. निवडणुका म्हटल्या की घराणेशाही हा विषय नेहमीच समोर येतो.
237 पैकी 89 ठिकाणी घराणेशाहीतील लोकांचा विजय
यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा 288 मतदारासंघांपैकी जवळपास 237 मतदारसंघात घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळालं. घराणेशाहीची पार्श्वभूमीवर असलेले उमेदवार येथील मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र, या 237 उमेदवारांपैकी केवळ 89 उमेदवारांनाच जनतेनं निवडणूक दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार
- काँग्रेस - 42
- राष्ट्रवादी शप - 39
- शिवसेना ठाकरे - 19
- भाजप - 49
- राष्ट्रवादी अप- 26
- शिवसेना शिंदे - 19
- इतर - 43












Click it and Unblock the Notifications