मनोज जरांगे पाटील आज मोठा निर्णय घेणार, उमेदवार आणि मतदार संघाची होणार घोषणा
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज आपल्या उमेदवारांची यादी सायंकाळी 5 वाजता घोषित करणार आहेत. दलित व मुस्लिम समाजाला एकत्र करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.

राज्यातील कोण-कोणत्या मतदारसंघात आपले उमेदवार उभे करायचे यावर आज अंतरवली सराटी येथे चर्चा होणार आहे. ज्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्या उमेदवारांनी आज अंतरावली सराटीत येण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं होतं. आज जरांगे पाटील कोणत्या मतदार संघात कोण उमेदवार द्यायचा याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नेत्यांची गर्दी अंतरवालीत बघायला मिळतेय.
आजच्या बैठकीत ज्या मतदारसंघाची निवड होणार आहे. त्या मतदार संघात एकच उमेदवार उभा राहणार, इतर उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेयचा असं सुत्र ठरलं असल्याची माहिती आहे. आपल्या मतदार संघात बैठका घ्या आणि त्यातूनच तुम्हीच एक उमेदवार ठरवा अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली आहे.
राज्यातील अनेक मतदार संघात इच्छूक उमेदवारांमध्ये एकमत होत नसल्याने ते सर्व उमेदवार आज अंतरवाली सराटीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. या उमेदवारांशी जरांगे पाटील चर्चा करुन तोडगा काढणार आहेत. जो उमेदवार अंतिम होईल त्या उमेदवाराचं बाकीचं उमेदवारांनी काम करायचं असं गणित जुळलं आहे. आज सायंकाळी 5 वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन आपल्या उमेदवारांची यादी घोषित करणार आहेत.












Click it and Unblock the Notifications