लाडकी बहीण योजनेवरुन भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त वक्तव्य
कोल्हापूर : लाडकी बहीणचे 1500 रुपये घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून घ्या, त्यांचे नावे लिहून घ्या आणि ते फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो", असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. ते शनिवारी एका जाहीर सभेत बोलत होते. त्यामुळे आता राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे.
दरम्यान धनंजय महाडिक या वक्तव्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी नव्हते, असं स्पष्टीकरण महाडिक यांनी दिलं आहे.

धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून महाडिक यांच्यावर जोरदार टीका होत आहे. कॉंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या विधानावरून खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर काँग्रेसचे काँग्रेसचे सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका केली आहे.
कॉंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे . येथे महिलांचा सन्मान केला जातो. परंतु धनंजय महाडिक यांनी महिलांचा अवमान केला आहे. त्यांनी राज्यातील महिलांची माफी मागायला हवी. महाडिक यांच्या वक्तव्यातून भाजपची महिलांकडे पाहण्याचे नेमकी प्रवृत्ती काय दिसून आली आहे, प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेअर करीत धनंजय महाडिक यांची ही मुजोरी असल्याची टीका केली आहे. 'भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी. महिलांना जाहीर सभेत धमकी दिली आहे. .काँग्रेसच्या रॅली, सभेत महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि आमच्याकडे द्या.आम्ही व्यवस्था करतो असं विधान केलं होतं.












Click it and Unblock the Notifications