चांदिवली विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे दिलीप लांडे दुस-या विजयासाठी सज्ज
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे तरुणांचे नेते आणि शिवसेना ही सुरुवातीच्या काळापासून तरुणांची संघटना राहिलेली आहे. शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील तरुण मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती दिली.. शिवसेनेनेही तरुण उमेदवारांना संधी देत अनेक तडफदार नेतृत्व घडवली. आणि या तरुणांनाच जबाबदारीची पदेही शिवसेनेतच मिळाली.. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांचाही महाराष्ट्रातील तरुण मनावर चांगलाच करिष्मा आहे. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा शिंदे यांचा आमदार म्हणजे चांदीचे दिलीप मामा लांडे.
काम करणारा माणूस
दिलीप लांडे यांनी अगदी तरुण वयात शिवसेनेतून कामाला सुरुवात केली.. राकट आणि रांगड्या शिवसैनिकाप्रमाणेच त्यांच्या नेतृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाचीही जडणघडण होत गेली. शिवसेनेत असतानाही ते राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात असत. राज यांच्याबरोबरच त्यांनी शिवसेना सोडली आणि चांदीवली परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करायला सुरुवात केली. या परिसरात विभाग प्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. काम करणारा माणूस अशी ओळख त्यांनी चांदीवली परिसरात निर्माण केली आहे.

2012 आणि 2017 अशा मुंबई महानगरपालिकेच्या दोन निवडणुका त्यांनी विजय मिळवला आणि ते नगरसेवक झाले. मात्र मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यातही दिलीप लांडे यांचा समावेश होता. 2019 साली शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी चांदीवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आणि काँग्रेसचे बडे नेते आणि चांदिवली परिसरातून सातत्याने निवडून येणारे नसीम खान यांचा पराभव करून दिलीप लांडे विधानसभेत दाखल झाले.
एकनाथ शिंदे यांना साथ
2019 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा घेतली आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी संधान साधून महाविकास आघाडीची स्थापना केली. मुख्यमंत्री पदाच्या या काळात त्यांचे स्वतःच्या पक्षातील आमदारांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आणि दुर्लक्षित असलेले हे आमदार तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात जाऊ लागले. दिलीप लांडे यांचाही त्यात समावेश होता. 2022 साली झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडात अन्य आमदारांप्रमाणेच दिलीप लांडे यांनीही एकनाथ शिंदे यांना साथ दिली.
पुन्हा चांदिवलीच्या रिंगणात
आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून दिलीप मामा लांडे यांची ओळख राहिलेली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही दिलीप लांडे यांच्या स्वभावातील आक्रमकपणा कमी झाला नाही. मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी चांदीवली मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दिलीप लांडे यांना संधी दिली आहे.
मुंबईत विविध विकासकामे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुंबई शहराच्या विकासाकडे आणि विविध योजना राबवण्याकडे विशेष लक्ष दिले. मुंबई मेट्रो तीन चा पहिला टप्पा एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच सुरू झाला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुंबई शहर सौंदर्यकरण, डीप क्लीन ड्राईव्ह असे अनेक उपक्रम एकनाथ शिंदे यांनी राबवले आणि मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वातच चांदीवली येथील संघर्ष नगर येथे 220 खाटांच्या बारा मजली रुग्णालयाची पायाभरणी करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या रुग्णालयाचा उपयोग होणार आहे. क्रांतीनगर आणि संदेश नगर येथील प्रकल्पामुळे बाधित झालेल्या तीन हजार झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन एचडीआयएल संकुल कुर्ला येथे करण्यात आले आहे यासाठी दिलीप लांडे यांनी पुढाकार घेतला होता.
कुर्ला अंधेरी रस्त्याचे सौंदर्यीकरण
संघर्ष नगर येथेच अत्याधुनिक सुख सोयीने उपलब्ध अशा क्रीडा संकुलाची उभारणी दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. महानगरपालिकेने आरक्षित केलेल्या भूखंडावर हे क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे ज्याची पायाभरणी नुकतीच करण्यात आली आहे. चांदीवली हा विधानसभा मतदारसंघ अंधेरी आणि कुर्ला या दोन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांच्या मधोमध येतो. मध्य रेल्वे मार्ग वरील उपनगरे आणि पश्चिम मार्गावरील उपनगरे या दोन्हींसाठी कुर्ला आणि अंधेरी ही दोन्ही ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून कुर्ला अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण, सुधारणा आणि सौंदर्यकरण पूर्ण करण्यात आले कुर्ला घाटकोपर येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या नागरिकांसाठी या रस्त्याचा खूप उपयोग होत आहे.चांदिवली विधानसभा मतदारसंघातील काजूपाडा पाईपलाईन रोड अद्यावत करण्यासाठी दिलीप लांडे यांच्या पाठपुराव्यातून प्रयत्न करण्यात आले. या रस्त्याचे सौंदर्यकरण करण्यात आले असून हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर दिलीप मामा लांडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न केले आहेत. शहरी भागातील भारतीय जनता पक्षाची संपूर्ण ताकद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. 2019 प्रमाणे यावेळीही दिलीप लांडे यांचा सामना काँग्रेसचे नसीम खान यांच्याशी होत आहे. येथे धार्मिक ध्रुवीकरण होण्याची दाट शक्यता आहे. गेले वेळी निसटत्या फरकाने विजयी झालेले दिलीप लांडे यावेळी मोठा विजय मिळवतील असा दावा स्थानिक शिवसैनिक करीत आहेत.












Click it and Unblock the Notifications