Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोहोळीकर संपवणार पराभवाचा सिलसिला, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष हा राजकारणात प्रस्थापित असलेल्या नेतृत्वांशी झाला हा इतिहास आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना असंख्य शिवसैनिकांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर शिवसेनेचा झेंडा खेडोपाडी फडकत ठेवला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपापल्या कार्यक्षेत्रात आपले बालेकिल्ले मजबूत केले.

धाराशिव,लातूर,नांदेड,हिंगोली अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये प्रस्थापितांच्या बुरुजांना धडका देणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण जिगरबाज शिवसैनिकांनी ती वास्तवात आणून दाखवली. अशा लढाऊ शिवसैनिकांची प्रचंड मोठी ताकद महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दिमाखाने उभी आहे. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणारा शिवसैनिक म्हणजे बाबुराव कदम कोहळीकर.

Baburao Kadam Kohlikar

शिवसेनेचे लढाऊ कार्यकर्ते

बाबुराव कदम कोहळीकर हे हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात निवघा जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू केली असून त्या गटातून ते दोन वेळा विजयी झाले होते. सतत पंचवीस वर्षे त्यांनी आपल्या गटावर शिवसेनेचा भगवा फडकविला. सन 2009 साली त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात कोहोळीकर यांचा पराभव झाला होता. पराभवाचे शल्य मनात न बाळगता त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण सुरूच ठेवले होते. त्यांच्याकडे शिवसेनेची मोठी फळी होती. आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर आणि शिवसैनिकांच्या ताकदीवर त्यांनी सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवला होता. नागेश पाटील अष्टीकर त्या निवडणुकीत निवडून आले होते

आष्टीकर यांच्याशी संघर्ष

काही महिन्यातच कोहळीकर यांचे शिवसेना माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख पदावरुन राजकीय वैमनस्य सुरू झाले. कोहोळीकरांचे जिल्हाप्रमुख पद काढून घेण्यात आले. दरम्यान जिल्हाप्रमुखपद काढून घेतल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांत नाराजीचा सूर पसरला होता. याचाच परिणाम विधानसभा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बघावयास मिळाला. ज्यात कोहोळीकरांनी अपक्ष निवडणूक लढवून क्रमांक दोनची मते घेतली. अपक्ष उमेदवार असणाऱ्या कोहळीकरांनी इतिहास घडवला. त्यामुळे त्यांची राजकीय ताकद वाढली.

एकनाथ शिंदे यांना पाठींबा

विधानसभा निवडणूक पार पडून अडीच वर्षाचा कालखंड लोटला. यादरम्यान बाबुराव कदम कोहळीकर परत शिवसेनेत येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. परंतु या चर्चा वेळोवेळी थंडावल्या गेल्या त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची ही बातमी माध्यमांपर्यंत आली होती. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावले होते. अखेरीस कोहोळीकर यांनी समर्थकांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या बैठकीत त्यांची राजकीय दिशा ठरवत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याचं निश्चित केलं.

लोकसभेला पराभव

शिवसेनेत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोहोळीकर यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले. मात्र 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांचा एक लाख आठ हजार मतांनी पराभव झाला. कोहोळीकर यांना तीन लाख 83 हजार तर उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर यांना चार लाख 92 हजार मते मिळाली. आता विधानसभा निवडणुकीसाठी हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी कोहोळीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

हदगावमध्ये विविध विकासकामे

राज्य सरकारने 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करून पानगंगा नदीवर बंधारा उभारला आहे या बंधाऱ्याच्या माध्यमातून हादगाव आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघात बारा महिने सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून तब्बल एक लाख एकर शेत जमीन ओलीताखाली येत आहे. 24 कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारच्या वतीने हिमायतनगर येथे आदिवासी मुलींसाठी आणि मुलांसाठी वस्तीगृहाची उभारणी करण्यात येत आहे.

आदिवासी समाजातील मुला मुलींसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तमसा आणि निवघा या दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. मंठा आणि तळणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात आली असून स्थानिक नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील अनेक कामांसाठी बाबुराव कोहळीकर यांनी पाठपुरावा केला आहे.

हदगावच्या मैदानात 24 उमेदवार

बाबुराव कोहळीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जातात.आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा एकनाथ शिंदे यांचा स्वभाव आहे. महायुतीत असलेला सध्याचा समन्वय पाहता भाजपची ताकद पूर्ण क्षमतेने कोहळीकर यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. कोहळीकर यांचा सामना काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पवार यांच्याशी होत आहे तब्बल 24 उमेदवार रिंगणात असल्यामुळे कोहोळीकर यांना विजयाची संधी अधिक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+