Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; आता गुप्त बैठका अन् बुधवारी मतदान

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. सत्ताधारी व विरोधकांकडून या प्रचाराच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल चढवला गेला.

तर आता उद्याचा दिवस अर्थात मंगळवारी गुप्त बैठकांवर पक्षांकडून जोर असणार आहे. दुसरीकडे निवडणूक आय़ोगाची देखील करडी नजर त्यांच्यावर असणार आहे. दरम्यान, बुधवारी मतदान आणि शनिवारी दि.23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

गेल्या महिन्यात आयोगाने केली होती निवडणुकीची घोषणा

निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर राज्यात प्रचाराला जोरदार सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीसाठी आपली संपूर्ण ताकद लावली.

तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचे प्रमुम उद्धव ठाकरे यांनी त्यांची तोफ धडाडत ठेवत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.

Maharashtra Assembly Election 2024

बुधवारी दि. 20 रोजी मतदान

288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. त्यात राज्यातील 4 कोटी 95 लाख पुरुष व 4 कोटी 64 लाख महिला मतदारांसह एकूण 9 कोटी 59 लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. हे मतदार 4136 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदान यंत्रात बंद करतील.

'द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स'च्या (ADR) माहितीनुसार, राज्यातील 4136 उमेदवारांपैकी 490 उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे, 496 उमेदवार प्रादेशिक पक्षांचे, 1036 उमेदवार मान्यता नसलेल्या पक्षांचे, तर 2087 उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत.

शिवसेना व राष्ट्रवादी फूटीनंतर पहिलीच विधानसभा निवडणूक

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीद्वारे आपलाच गट खरा राष्ट्रवादी व शिवसेना आहे हे दाखवून देण्याची नामी संधी आहे.

त्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात सभा घेत अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. भाजपने आपल्याला कसा धोका दिला? व एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी कशी गद्दारी केली? हे उद्धव ठाकरे यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.

शरद पवार यांनी या प्रकरणी भाजपवर प्रहार करत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकारी आमदारांना पाडण्याचे आवाहन केले. या प्रकरणी मोदी - शहांच्या भाजपपासून महाराष्ट्राचा बचाव करणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत मराठी अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न केला.

महायुतीचा प्रचार होता हिंदूत्वावर

दुसरीकडे, भाजप व महायुतीचा संपूर्ण प्रचार हिंदुत्वाच्या मुद्याभोवती फिरता राहिला. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीने विकासाच्या जोरावर मते मागितली.

त्यानंतर हा प्रचार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक है तो सेफ है'च्या दिशेने पुढे सरकला. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महायुतीने या मुद्यावरून विरोधकांवर निशाणा चढवत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी होईल सर्वांचा फैसला

दरम्यान, महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. पण मतदार अखेरच्या क्षणी कुणाच्या पारड्यात आपले मतदान टाकतील हे बुधवारी होणारे मतदान व त्यानंतर शनिवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीसंबंधित आकडेवारी

  • एकूण जागा 288
  • एकूण उमेदवार 4136
  • पुरुष मतदार 4 कोटी 95 लाख
  • महिला मतदार 4 कोटी 64 लाख
  • एकूण मतदार 9 कोटी 59 लाख


दशसूत्री विरुद्ध पंचसूत्री

महायुतीने गॅरंटीची 'दशसूत्री' दिली तर त्याला महाविकास आघाडीकडून 'पंचसूत्री' सादर करून प्रत्युत्तर देण्यात आले. लाडकी बहीण योजनेवर महायुती व महाविकास आघाडीने जाहीरनाम्यांमध्ये भर दिला. महायुती आणि महाविकास आघाडीचे संयुक्त जाहीरनामे जाहीर करण्यात आले. मात्र शिवसेने (शिंदे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांनी आपले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले नाहीत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+