Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यातील 'या' विधानसभा मतदारसंघात NCP विरुद्ध NCP अशी लढत; जाणून घ्या- कुठे अटीतटीचा सामना

NCP vs NCP: महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई सद्या राज्यात पाहायला मिळत आहे. अगदी तशीच लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी देखील पाहायला मिळत आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या चौघांसाठी प्रतिष्ठेची आहे. निवडणूक जिंकत आपणच खरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून चालू आहे. दरम्यान फूट पडल्यामुळे अनेक मतदारसंघात हे आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. यात प्रामुख्याने राज्यातील 38 ठिकाणी एनसीपी विरुद्ध एनसीपी अशी थेट लढत व चुरशीची लढत होत आहे. चला तर जाणून घेऊया, कोणत्या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आहे. यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचा समावेश आहे.

Maharashtra Assembly Election 2024

राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी - एकूण 38

1) अमरावती - वरूड-मोर्शी देवेंद्र भुयार (NCP) + उमेश यावलकर (BJP) गिरीश कराळे (SP)

2) काटोल चरणसिंह ठाकूर (BJP) + अनिल देशमुख (NCP) सलील देशमुख (SP)

3) तुमसर राजे कारेमोरे (NCP) चरण वाघमारे (SP)
4) अहेरी (ST) धर्मरावर बाबा आत्राम (NCP) भाग्यश्री आत्राम (SP)
5) पुसद इंद्रनील नाईक (NCP) शरद मैंद (SP)
6) वसमत चंद्रकांत उर्फ राजू नवघरे (NCP) जयप्रकाश दांडेगावकर (SP)
7) माजलगाव प्रकाश दादा सोळंके (NCP) मोहन बाजीराव जगताप (SP)
8) बीड योगेश क्षीरसागर (NCP) संदीप क्षीरसागर (SP)
9) परळी धनंजय मुंडे (NCP) राजेसाहेब देशमुख (SP)
10) अहमदपूर बाबासाहेब पाटील (NCP) विनायकराव पाटील (SP)
11) उदगीर (SC) संजय बनसोडे (NCP) सुधाकर भालेराव (SP)
12) येवला छगन भुजबळ (NCP) माणिकराव शिंदे (SP)
13) सिन्नर माणिकराव कोकाटे (NCP) उदय सांगळे (SP)
14) दिंडोरी (ST) नरहरी झिरवाळ (NCP) सुनीता चारोस्कर (SP)
15) अकोले (ST) किरण लहामटे (NCP) अमित भांगरे (SP)
16) कोपरगाव आशुतोष काळे (NCP) संदीप वर्पे (SP)
17) पारनेर काशिनाथ दाते (NCP) राणी लंके (SP)
18) अहमदनगर शहर संग्राम जगताप (NCP) अभिषेक कळमकर (SP)
19) अणुशक्ती नगर सना मलिक ( NCP ) फहाद अहमद (SP)
20) शहापूर (ST) दौलत दरोडा (NCP) पांडुरंग बरोरा (SP)
21) मुंब्रा-कळवा नजीब मुल्ला (NCP) जितेंद्र आव्हाड (SP)
22) श्रीवर्धन आदिती तटकरे (NCP) अनिल नवघणे (SP)
23) चिपळूण शेखर निकम (NCP) प्रशांत यादव (SP)
24) जुन्नर अतुल बेनके (NCP) सत्यशील शेरकर (SP)
25) आंबेगाव दिलीप वळसे पाटील (NCP) देवदत्त निकम (SP)
26) शिरूर माऊली कटके ( NCP ) अशोकराव पवार (SP)
27) इंदापूर दत्तात्रय भरणे (NCP) हर्षवर्धन पाटील (SP)
28) बारामती अजित पवार (NCP) युगेंद्र पवार (SP)
29) वडगाव शेरी सुनिल टिंगरे ( NCP ) बापूसाहेब पठारे (SP)
30) हडपसर चेतन तुपे (NCP) प्रशांत जगताप (SP)
31) माढा मीनल साठे (NCP) अभिजित पाटील (SP)
32) मोहोळ (SC) यशवंत माने (NCP) राजू खरे (SP)
33) फलटण (SC) सचिन पाटील (NCP) दीपक चव्हाण (SP)
34) वाई मकरंद पाटील (NCP) अरुणादेवी पिसाळ (SP)0
35) चंदगड राजेश पाटील (NCP) नंदिनीताई भाबुळकर कुपेकर (SP)
36) कागल हसन मुश्रीफ (NCP) समरजीत घाटगे (SP)
37) इस्लामपूर निशिकांत पाटील ( NCP) जयंत पाटील (SP)
38) तासगाव-कवठे महांकाळ संजयकाका पाटील ( NCP ) रोहीत पाटील (SP)


बारामतीत अस्तित्वाची लढाई

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुक झाली. यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 8 खासदार निवडून आले होते. त्यामुळे स्ट्राईक रेट हा शरद पवार यांच्या पक्षाचा चांगला होता. तर आता विधानसभा निवडणुकीत देखील बारामतीमध्ये यंदा प्रतिष्ठेची लढाई आहे. बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातच सामना होणार आहे. याचं कारण अजित पवार यांच्याविरोधात शरद पवारांनी नातू व अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+