विश्वनाथ भोईर करणार विजयाची पुनरावृत्ती,कल्याण पश्चिम मध्ये सोपी लढत
Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी आपले माप एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात टाकले. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना लोकसभेची निवडणूक सोपी गेली आणि ठाणे जिल्ह्यात नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे हे दोन्ही खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकले. शिंदे यांना पाठबळ देणाऱ्या आमदारांत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
विश्वनाथ भोईर हे कल्याण डोंबिवली परिसरातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. लोकांच्या प्रश्नासाठी प्रशासनाला थेट भेटण्याचा त्यांचा स्वभाव आहे. मतदारसंघात विकास कामांच्या पूर्ततेसाठी ते सातत्याने आग्रही असतात. मतदारसंघातील सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना त्यांचे नेहमीच पाठबळ लाभत असते. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात लोकप्रिय असलेला स्थानिक चेहरा म्हणून विश्वनाथ भोईर परिचित आहेत.

2019 साली पहिला विजय
2019 साली ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. 2019 नंतरची पाच वर्षे ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा संपूर्ण बदलणारी वर्ष म्हणून ओळखली जातील. उद्धव ठाकरे यांनी युती तोडून आयत्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली आणि स्वतःला मुख्यमंत्रीपद तसेच मुलासाठी कॅबिनेट मंत्रीपद पदरात पाडून घेतले. जनतेने नाकारलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरे यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात सत्तेवर आले. सर्वाधिक जागा मिळालेला भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर जाऊन बसला. आणि मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती असलेले देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते झाले.
मुख्यमंत्रीपदात व्यस्त असलेल्या उद्धव ठाकरे यांचे संघटनेकडे सपशेल दुर्लक्ष झाले आणि संघटनेतील संतापाचा बंडाळीत स्फोट झाला. तब्बल 40 आमदारांसह एकनाथ शिंदे गुवाहाटीच्या दिशेने निघून गेले आणि भाजपच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री सुद्धा झाले. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह सोबत घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपला करिष्मा दाखवून दिला. ठाणे, पालघर या हक्काच्या जिल्ह्यातील आमदारांनी दिलेला पाठिंबा एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.
धडाक्याने विकासकामे
मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या सोबत आलेल्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात धडाकेने विकास कामे राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली. कल्याण पश्चिम या विश्वनाथ भोईर यांच्या विधानसभा मतदारसंघातही शेकडो कोटी रुपयांची कामे करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत 100 खाटांचे सुपर स्पेशलिटी रुग्णालय उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती. विश्वनाथ भोईर यांनी त्याचा खूप पाठपुरावा केला आणि एकनाथ शिंदे यांनी त्याला मान्यता दिली आहे.
बहुमजली वाहनतळ
मुंबई शहर सातत्याने वाढत आहे. मध्य रेल्वे मार्गावर ते कल्याण अंबरनाथ ओलांडून कधीचेच पुढे गेले आहे. कल्याणहून मुंबईकडे येजा करणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड मोठी आहे. आणि वाहतूक कोंडी हे कल्याण शहराची मोठी समस्या आहे. वाहतूक कोंडीच्या जाचामुळे गर्दीच्या वेळी स्वतःचे वाहन रस्त्यावर उतरवणे कल्याणकरांसाठी खूपच त्रासदायक ठरते. शहरात पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली होती. कल्याण रेल्वे स्थानकानजीक उभारण्यात आलेल्या दिलीप कपोते बहुमजली वाहन तळामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. संपूर्ण शहरवासीयांनाच ही मोठी भेट ठरली आहे आणि त्यामुळे वाहनांची ये जा अधिक सुरळीत झाली आहे.
गौरीपाडा पार्क
गौरीपाडा पार्कच्या रूपाने कल्याणवासीयांसाठी आणखी एक सुविधा सरकारने निर्माण केली आहे. स्थानिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून येथील सुविधा आणि बांधकामांचा 3000 हून अधिक लोक नियमित वापर करीत आहेत. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या परिसराला जोडणारा रेल्वे पूल विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यातून पूर्ण करण्यात आला आहे त्यामुळे या दोन्ही परिसरात ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी सुविधा झाली आहे आणि दोन्ही परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. त्याचप्रमाणे विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यातूनच साकारलेले वडवली कल्चरल पार्क स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. संपूर्ण मतदारसंघातील नागरिक त्याचा लाभ घेत आहेत.
विजयाच्या पुनरावृत्तीचा विश्वास
विश्वनाथ भोईर यांचा मतदारसंघात तगडा जनसंपर्क आहे. मतदारसंघात विविध विकास कामे खेचून आणण्यासाठी त्यांनी अनेक वेळा संघर्षाची भूमिका घेतली आहे. घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर कल्याण मधील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची सूचना त्यांनी महानगरपालिकेला केली होती. कल्याण डोंबिवली साठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करण्यासाठी ते आग्रही आहेत. अडीअडचणीला धावून जाणारा आणि घटनास्थळी उपस्थित असणारा आमदार म्हणून त्यांना ओळखले जाते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आपल्या मतदारसंघात केलेली आहे. तसेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते आग्रही असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कल्याण डोंबिवली परिसर आणि तेथील लोकप्रतिनिधींवर विशेष लक्ष आहे. या परिसरात शिवसेनेच्या स्थानिक उमेदवारांच्या पाठीशी मोठी ताकद श्रीकांत शिंदे लावणार आहेत. त्यामुळे विश्वनाथ भोईर विजयाची पुनरावृत्ती करतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनी या मतदार संघात सचिन बासरी यांना उमेदवारी दिली आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications