महायुतीचे पारडे जड; जनसुराज्यचे अशोक माने यांना विजयाची अधिक संधी
Maharashtra Assembly Election 2024 : तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन शक्ती भिडत आहेत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी हे महायुतीतील प्रमुख पक्ष असले तरी रिपब्लिकन पक्ष, जनसुराज्य शक्ती असे पक्षही महायुतीचे घटक पक्ष आहेत. अशा पक्षांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात जागा देण्यात आल्या आहेत. वारणा साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्तीला जागा सोडण्यात आल्या आहेत. शाहूवाडी मधून जनसुराज्याचे अध्यक्ष विनय कोरे आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोक माने निवडणूक लढत आहेत.
विद्यमान आमदार कॉंग्रेसचा
एकेकाळी महाराष्ट्रात जनसुराज्य शक्ती पक्षाचे पाच पाच आमदार निवडून यायचे. सध्या पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. सध्या हातकणंगले या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजू बाबा आवळे हे आमदार आहेत. तर जनसुराज्य शक्तीने अशोक माने यांना संधी दिली आहे. पेठ वडगाव परिसरात पसरलेला विविध शिक्षण संस्थांचा पसारा आणि सूतगिरणी यांच्या माध्यमातून अशोक माने हे हातकणंगले परिसरात सुपरिचित आहेत. दलित मित्र या नावानेही त्यांना ओळखले जाते.

शिक्षण संस्था आणि सूतगिरणीच्या माध्यमातून त्यांचा हातकणंगले परिसरात मोठा जनसंपर्क आहे. अशोक माने यांना भाजपकडून तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती तर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील अशीही चर्चा होती. दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिनचेकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा झेंडा हाती घेतील असेही सांगितले जात होते.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर महायुतीतील सर्वच पक्षांचा डोळा होता. मात्र अखेरीस ही जागा जनसुराज्य पक्षाला देण्याचा निर्णय झाला आणि अशोक माने हेच जनसुराज्यच्या तिकिटावर लढतील असेही कालांतराने स्पष्ट झाले. वारणा साखर कारखान्याचे क्षेत्र आणि विरोधी मतांचे विभाजन यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षासाठी हातकणंगलेचे मैदान काहीसे सुरक्षित आहे असा मतप्रवाह कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.
लोकसभेवर महायुतीचा झेंडा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर असा सामना झाला होता.त्यात धैर्यशील माने यांनी बाजी मारून पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे आव्हान जिवंत ठेवले.या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खरे किंग मेकर ठरले. अखेरच्या क्षणापर्यंत ते हातकणंगलेत ठाण मांडून बसले होते.आताही जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या दोन जागा निवडून येतील अशी चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ऐकू येत आहेत.हातकणंगलेसह शाहूवाडीतही महायुतीचा झेंडा फडकेल असा अंदाज आहे.
विविध विकासकामे
महायुती सरकारने हातकणंगले विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे राबवली आहेत. शिवराज्यभवन हे महायुती सरकारच्या विकास कामांपैकी एक प्रमुख काम आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवराज्य भवनच्या माध्यमातून चांगली सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विशेषतः केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अन्य कार्यक्रमांसाठीही या माध्यमातून हक्काचे ठिकाण उपलब्ध होत आहे.
रस्त्यांच्या जाळ्याची निर्मिती
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा ऊस पट्ट्यातला मतदार संघ आहे. शेती हाच येथील प्रमुख व्यवसाय आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती हातकणंगले मतदारसंघाची तातडीची आवश्यकता होती. संपूर्ण हातकणंगले विधानसभा मतदारसंघात रस्त्यांचे जाळे उभारण्यात येत आहे. विशेषतः वाठार वाडगाव रस्ता हा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता ठरत आहे. रस्त्याच्या झाडांच्या माध्यमातून वाहतुकीची सुविधा आणि मालवाहतुकीची सुविधा अधिक गतिमान होत आहे.
बिरदेव मंदिराची उभारणी
पट्टणकडोली हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून पट्टणकडोलीची ओळख आहे. तीन कोटी रुपये खर्च करून येथे नव्या बिरदेव मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. या मंदिरामुळे परिसराला एक वेगळी ओळख मिळणार असून भाविकांची ये जा परिसरात वाढणार आहे. मतदारसंघातील कोची या गावात भैरवनाथ मंदिराची सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे या गावाचा सांस्कृतिक वारसा जपला जात आहे.
मतदारसंघातील पेठ वडगाव येथे नव्या बस स्थानकाची उभारणी करण्यात येत असून त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. पेठ वडगाव परिसरातून बसने येजा करणाऱ्या नागरिकांची संख्या खूपच मोठी आहे. नव्या बस स्थानक इमारतीमुळे या प्रवाशांना चांगला दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांना सुविधा देखील मिळणार आहे.विविध संस्थांच्या माध्यमातून असलेला प्रचंड जनसंपर्क, वारणा साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आणि मतदारसंघात राबवण्यात असलेली विकास कामे यांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार अशोक माने विधिमंडळात निवडून जातील अशी चर्चा आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!









Click it and Unblock the Notifications