Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पवार कुटुंबात चांगलंच वाजतंय... आता अजित पवार विचारणार प्रतिभा काकींना प्रश्न

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात सध्या दोन्ही पवार कुटुंबात जोराचा प्रचार सुरु असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी सध्या शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंग्र पवार यांचे आई-वडील व शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार याही मैदानात उतरल्या आहेत.

प्रतिभा पवार पहिल्यांदाच प्रचारात दिसल्याने काहींनी अजित पवारांना याबाबत विचारले. त्यावर अजित पवारांनीही प्रतिभा काकींना निवडणुकीनंतर एक प्रश्न विचारणार असल्याचे सांगत, मिश्किल टिपण्णी केली. अजित पवारांच्या याच वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Dcm Ajit Pawar

पवार कटुंब युगेंद्रसाठी मैदानात

बारामती मतदारसंघात अजित पवार विरूध्द पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. पवारांचं अख्ख कुटूंब युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार त्यांचे आई वडिल यांच्यासह प्रचारामध्ये शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही दिसत आहेत. बारामती मतदारसंघात ठिकठिकाणी जात प्रतिभा पवार प्रचार करताना दिसत आहेत. अजित पवारांनी या प्रचारावर आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले, 'मला तुम्ही 1991 पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाकाकी कधी बाहेर आल्या का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी होती. मी फार बाद झालो, मी बारामतीचं पार वाटोळं केलं असतं, तर गोष्ट वेगळी होती. निवडणूक झाल्यावर मी काकींना त्या नातवाचा एवढा पुळका आला होता हे विचारणार आहे. आत्ता काकींना हा प्रश्न विचारण्याची वेळ नाही', असंही पुढं अजित पवार स्पष्ट केलं.

अजित पवारांचा बारामतीत दौरा

अजित पवार आज बारामतीमध्ये गावभेट दौरे करत आहेत. आज अजित पवार पानसरे वाडी, जळगाव सुपे, कऱ्हावागज, काऱ्हाटी आणि अंजनगाव या गावात आहेत. अजित पवार शेतकरी आणि महिलांना महायुती सरकारच्या योजना समजावत आहेत. केलेल्या कामांचा आढावा सर्वांसमोर मांडत आहेत. लोकसभेला तुम्ही गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमत होईल, असंही अजित पवार सांगत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+