मोठी बातमी! जेपी नड्डा यांना गुरुद्वारातून घ्यावा लागला काढता पाय; पहा नेमकं काय घडलं...
ठाणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवार, प्रचार, यंत्रणा याबाबत रोज नवनवे अपडेट येत आहे. अशातच आज एक मोठी बातमी समोर आली. गुरुद्वारात दर्शनासाठी गेलेले भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गुरुद्वारातील सुरक्षारक्षकांनी बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर नड्डा यांनीही तातडीने तेथून काढता पाय घेतला. नेमका प्रकार काय झाला, यावर मात्र आता सध्या चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

नेमकं काय घडलं
सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. आज शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे ठाण्यात आले आहेत. त्यांनी ठाण्यातील गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. नड्डा गुरुद्वारात पोहोचले त्यावेळी तेथे सत्संग सुरु होता. नड्डा आल्यामुळे त्यात व्यत्यत आला. नड्डा हे दर्शन घेऊन तेथेच सत्कारासाठी थांबले. मात्र त्यामुळे सत्संग व कीर्तनात जास्त व्यत्यय आल्याने. तेथील सुरक्षारक्षकांनी नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांना तेथून बाहेर जाण्याचा सल्ला दिला.
नड्डा यांनीही घेतला काढता पाय
ठाणे शहराचे उमेदवार संजय केळकर आणि शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज ठाण्यात आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक आणि विशेष सभा घेतली. यापूर्वी त्यांनी गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने त्यांनी सुरवातीला तीन हात नाका येथील गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माधवी नाईक, संजय वाघुले हे नेते उपस्थित होते. त्यांनी गुरुद्वारात दर्शन घेतले. त्यांनी थोडा वेळ भेटी गाठी घेतल्या. कीर्तनात सहभाग घेतला. यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्यामुळे नड्डा हे त्याठिकाणी थांबले होते. परंतु सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय येत होता. यामुळे येथील सेवकांनी त्यांना विनंती करत येथून निघून जा असे सांगितले आणि नड्डा यांना तेथून अखेर काढता पाय घ्यावा लागला.












Click it and Unblock the Notifications