बार्शीमधून राजेंद्र राऊत भक्कम स्थितीत, शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईत राऊतांचे पारडे जड
Maharashtra Assembly Election 2024 : 90 च्या दशकात बाळासाहेबांच्या विचाराने भारलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटले. शिवसेनेचा हा झपाटा प्रचंड होता. मुंबईत नगरसेवक असलेल्या शिवसैनिकांना त्यांच्या त्यांच्या गावाला जाऊन मतदारसंघाची बांधणी करण्यास सांगण्यात आले होते. संपर्क नेते आपापल्या विभागात झंझावाता सारखे फिरत होते. आणि गावोगावी राजकारणाच्या परिघाबाहेर असलेले बंडखोर स्वभावाचे तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली येत होते. सोलापूर आणि आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरील बार्शीचा असाच एक रगेल शिवसैनिक म्हणजे राजेंद्र राऊत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन राजेंद्र राऊत हे शिवसेनेत दाखल झाले. एखाद्या सामान्य शिवसैनिकाप्रमाणेच त्यांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. बार्शी शहराच्या राजकारणात ते विशेष सक्रिय होते. 1996 साली नगरसेवक आणि 1998 साली नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. बार्शीत दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असा संघर्ष सुरू होण्याचा तो काळ होता.

1995 साली बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या दिलीप सोपल यांनी युतीला पाठिंबा दिला होता. पण 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि दिलीप सोपल हे राष्ट्रवादीत सहभागी झाले. शिवसेनेने 1999 साली सोपल यांच्या विरोधात राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली. पहिल्या निवडणुकीत राऊत यांचा पराभव झाला परंतु पराभवाने राऊत खचले नाहीत. त्यांनी नव्या जोमाने लढा देण्यास सुरुवात केली.
2004 साली पहिल्यांदा विधानसभेत
2004 साली शिवसेनेने त्यांना पुन्हा तिकीट दिले. आणि या निवडणुकीत चमत्कार घडवून राजेंद्र राऊत विधानसभेत दाखल झाले त्यांनी दिलीप सोपल यांचा पराभव केला. 2005 साली शिवसेनेत नारायण राणे यांनी बंड केले. शिवसेनेला हादरवून सोडणारे ते दुसरे बंड होते. तब्बल 11 आमदार नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले. राणे यांना महसूल मंत्रीपद मिळाले आणि त्यांच्या समर्थनात असलेल्या 11 आमदारांच्या मतदार संघात विधानसभा पोटनिवडणुका घेण्यात आल्या. राजेंद्र राऊत यांनी राणे यांना समर्थन दिले होते. 2009 साली राजेंद्र राऊत पराभूत झाले 2014 साली पुन्हा त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली मात्र यावेळी ही त्यांच्या नशिबी पराभव आला.
अपक्ष म्हणून मारली बाजी
2019 साली राजेंद्र राऊत अपक्ष लढले. बार्शी सारख्या ग्रामीण मतदार संघात आणि समोर बलाढ्य उमेदवार असताना अपक्ष निवडून येणे ही जीकिरीची बाब होती. पण राऊत यांनी हे आव्हान स्वीकारले. मतदारसंघात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा होऊनही दिलीप सोपल यांचा यांचा त्यांनी पराभव केला आणि ते विधानसभेत दाखल झाले.
देवेंद्र फडणवीस यांचे लाडके
2019 नंतरचा काळ हा महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी देणारा काळ होता. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला कौल दिला होता. पण हा कौल डावलून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संधान साधले. उद्धव ठाकरे यांच्या डावपेचामुळे जनतेने नाकारलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत आले तर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजप विरोधी बाकांवर बसला.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या महाविकास आघाडीने अपक्ष आमदारांचेही समर्थन घेण्यास सुरुवात केली. बहुसंख्या अपक्ष आमदार महाविकास आघाडी सोबत गेले. पण सत्तेबरोबर न जाता देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देत विरोधी बाकांवर बसलेला अपक्ष आमदार म्हणजे राजेंद्र राऊत होत. आघाडीच्या कार्यकाळात त्यांना बराच त्रास झाला. पण निधड्या छातीने त्यांनी विरोधाचा सामना केला. देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात ओळख निर्माण केली.
अन दिवस बदलले
2022 साली राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सत्तेबाहेर गेली आणि शिंदे फडणवीस यांची शिवसेना भाजपा युती सत्तेत आली. आणि राजेंद्र राऊत यांचे दिवस बदलले. गेल्या दोन वर्षात राऊत यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आपल्या मतदार संघात खेचून आणला .
संघर्ष करणारा स्पष्टवक्ता आमदार
सत्तेत असो किंवा सत्तेत नसो, जनतेसाठी लढत राहण्याचा राजेंद्र राऊत यांचा स्वभाव आहे. अत्यंत आक्रमकपणे ते आपली भूमिका मांडतात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्याशी संघर्ष करणारे आणि बेमुदत उपोषणाचा इशारा देऊन प्रत्यक्ष कृती करणारे आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांची ओळख आहे.
मतदारसंघातील बहुतांश बाजार समित्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था राउत नेहमीच स्वतःच्या ताब्यात ठेवत आले आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. थेट आणि स्पष्ट भूमिका मांडणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना ओळखले जाते. राज्याच्या राजकीय वर्तुळात राजा राऊत म्हणून ते प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांसाठी त्यांनी केलेली भाषणे विशेष गाजली.
फडणवीस यांचा लाडका सेनेत
शिवसेना भाजपा युतीत बार्शी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचा भरवशाचा आमदार शिवसेनेत दाखल झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातून राऊत यांना संधी दिली आहे. त्यांचा सामना उबाठा गटाचे दिलीप सोपल यांच्याशी होत आहे. मतदारसंघातील गणितं लक्षात घेता ही लढत राजेंद्र राऊत यांना सोपी जाईल असा पश्चिम महाराष्ट्रातील जाणकारांचा अंदाज आहे.
-
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा









Click it and Unblock the Notifications