स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन; कोण होते ते? वाचा त्यांच्याविषयी
Legendary Sculptor Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेला जागतिक उंचीवर नेऊन ठेवणारे आणि आपल्या छिन्नी-हातोड्याने महापुरुषांचा इतिहास जिवंत करणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धकाळाने निधन झाले. नुकताच २० मार्च २०२५ रोजी त्यांना राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला होता, जो त्यांच्या शताब्दी पूर्ण झालेल्या गौरवशाली प्रवासातील अखेरचा मानाचा तुरा ठरला.

महाराष्ट्र भूषण आणि अखेरचा प्रवास
२० मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर केला होता. "हा पुरस्कार महाराष्ट्राच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी त्यांचे अभिनंदन केले होते. राम सुतार यांनी आपल्या आयुष्याची १०० वर्षे केवळ कलेला वाहिली.
ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना सांत्वना दिली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2025
रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला.… pic.twitter.com/HwJ9EXBR9D
जागतिक कीर्तीची अजरामर शिल्पे
राम सुतार यांच्या कलेचा ठसा केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात उमटला आहे. त्यांच्या कारकीर्दीतील काही मैलाचे दगड..
स्टॅच्यू ऑफ युनिटी: गुजरातमध्ये उभारलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर (५९७ फूट) उंच पुतळा, जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
संसद भवन: भारताच्या संसदेतील महात्मा गांधींचा ध्यानस्थ पुतळा.
चंबळ देवी: मध्य प्रदेशातील गंगासागर धरणावरील ४५ फूट उंच चंबळ देवीचे शिल्प.
इतर महत्त्वाची शिल्पे: अमृतसरमधील महाराजा रणजित सिंह (२१ फूट), नवी दिल्लीतील सरदार पटेल (१८ फूट), आणि जम्मूतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (९ फूट) यांचे भव्य पुतळे.
राम लल्ला मूर्ती: २०२० मध्ये अयोध्या राम मंदिरासाठी त्यांनी राम लल्लाच्या मूर्तीचे प्रारूप तयार करण्यातही योगदान दिले होते.
सन्मान आणि वारसा
राम सुतार यांना त्यांच्या अफाट कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले होते. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात जन्मलेल्या सुतार यांनी शांतता, धैर्य आणि महामानवांच्या विचारांना आपल्या शिल्पांतून जिवंत ठेवले. कुरुक्षेत्रच्या ब्रह्मसरोवरातील कृष्ण-अर्जुन रथ असो वा गांधीजींचे अहिंसक रूप, त्यांच्या कलेने जगाला मंत्रमुग्ध केले.
जीवंतपणा हे सुतार यांच्या कलेचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला. अत्यंत बारकाईने केलेली कलाकुसर आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय होते. काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही गेलो होतो, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो. अनेक शिल्पांना त्यांनी आकार दिला. स्टॅच्यु ऑफ यूनिटीमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा किंवा अंदमानमधील वीर सावरकर यांचा पुतळा. वयाच्या 100 व्या वर्षी सुद्धा ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात गुंतले होते.
संसद भवन परिसरात सुद्धा त्यांनी तयार केलेले अनेक पुतळे आहेत. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले वारकरी संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम त्यांनी केले. या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि ते प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न!










Click it and Unblock the Notifications