..तर अशोक चव्हाणांच्या मुलीला निवडणुकीत पाडणार! लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज! या मतदारसंघात देणार पाठींबा
Laxman Hoke's open challenge to Ashok Chavan : आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण जोपर्यंत जाहीर भूमिका घेणार नाही तोपर्यंत आम्ही भोकर मतदारसंघात जावून त्यांचा उमेदवार (श्रीजया चव्हाण) पाडणार आहे. औसा येथील उमेदवारह आम्ही पाडणार आहोत असा इशारा ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी आज दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी पळ काढणारा नाही..
लक्ष्मण हाके म्हणाले, मी पळ काढणारा नाही, माझ्याकडे उमेदवारांची यादी आहे. तीन वाजेपर्यंत वाट पाहा मी यादी जाहीर करेल. आमची भूमिका ओबीसींच्या हक्कांसाठी आहे. दोनशे विधानसभा मतदारसंघात दोन लाखांहून संख्या ओबीसी आणि भटक्या विमु्क्त जातीजमातींची आहे पण महाराष्ट्रात पंचवीसपेक्षा जास्त उमेदवार सत्ताधारी पार्टीने दिलेले नाही.ही गोष्ट आम्ही महाराष्ट्रातील ओबीसींना समजावून सांगू.

या मतदारसंघातील उमेदवारांना पाठींबा
लक्ष्मण हाके म्हणाले, आमचे पाठींबा असलेले उमेदवार लातूर शहर, जत, सांगोला,मुखेड आणि मानचे आहेत. ते कुठल्याही पक्षांचे असो पण ते ओबीसी उमेदवार असतील. परतूर मंठा येथील उमेदवार महाविकास आघाडीचा थोडीच आहे, पण मी त्यांच्याबाजूने सभा घेतली आहे. जो माणूस आमच्या ओबीसी आरक्षणाच्या संविधानिक चौकटीआधारे बोलेल त्यांना आमचा पाठींबा असेल. याशिवाय आणखी काही मतदारसंघातील ओबीसी उमेदवार मग ते कोणत्याही पक्षांचे असो त्यांनी ओबीसी आरक्षणाला सपोर्ट करणार हे आम्हाला लेखी लिहून दिल्यास आम्ही त्यांना पाठींबा देऊ.
शरद पवारांच्या सांगण्यावरुन काळबेरं झालं तर...
लक्ष्मण हाके म्हणाले, आम्ही शरद पवारांच्या उमेदवारांनाही पाठींबा देणार आहोत पण आमची अट असेल की, ओबीसी आरक्षणाच्या संविधानात्मक चौकटीला धक्का लावणार नसेल तर आमचा त्यांना पाठींबा असेल आम्ही त्यांची सभाही घेऊ पण त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरुन जर ते काळंबेरं करायला उभे राहीले असतील तर आम्ही त्यांच्या उमेदवारांना पाडा असेही म्हणू.












Click it and Unblock the Notifications