Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रात लोकसभेला गेलं ते भाजपनं विधानसभेला कमावलं; झारखंड मात्र हातून गेलं, वाचा अधिकृत बलाबल

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज २३ नोव्हेंबर जाहीर झाला. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची होईल अशी चर्चा निवडणुकीआधी होती. मात्र आज निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला तर महायुतीने मोठं यश संपादन केलं. महायुतीला 230 तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावं लागलं. सपानंही दोन जागांवर विजय मिळवला.

Latest official statistics of Maharashtra and Jharkhand elections

भाजप सहज गेली 200 पार

रात्री उशीरा जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार महायुतीत भाजपाला 132, शिवसेना (शिंदे) 57, राष्ट्रवादी (अजित पवार) 41 जागा मिळाल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला शिवसेना ठाकरे गटाला 20 , राष्ट्रवादी (शरद पवार) 10 आणि काँग्रेसला 16 जागा मिळाल्या. या निवडणुकीत 10 अपक्षांनीही बाजी मारली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने आघाडीला 288 पैकी 200 पार जागा पार केल्या.

लाडकी बहीण योजना ठरली निर्णायक

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला होता, तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळवलं होतं. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत उलट चित्र पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदारांचा टक्का वाढला आणि या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला.

प्रचारात धर्म आणि जातीचा मुद्दा

विधानसभेच्या निवडणुकीत जाती आणि धर्माचे मुद्देही गाजले. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' अशी घोषणा दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ए है तो सेफ है' ही घोषणा दिली होती. त्यामुळे 'बटेंगे तो कटेंगे', 'ए है तो सेफ है' अशा घोषणांनी राज्य ढवळून निघालं. याशिवाय मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजला असतानाही महायुतीने हे दोन्ही मुद्दे व्यवस्थित हाताळले. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. याशिवाय या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मोठी भूमिका निभावल्याचे सांगितले गेले.

झारखंडमध्ये भाजपच यश हुकलं

झारखंडची निवडणुकीही भाजपने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीकडेही देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र तेथील जनतेने पुन्हा इंडी आघाडीवर विश्वास दाखवला. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा 34, भारतीय जनता पार्टी 21, काँग्रेस 16, राष्ट्रीय जनता दल 04, कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया 02, एजेएसयू 01, लोक जनशक्ती पार्टी 01, जेएलकेएम 01, जनता दल (युनायटेड) 01 जागा मिळाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+