Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज : एप्रिलचे पैसे आले; मे चा हप्ता कधी येणार? किती येणार? अपडेट काय?

राज्यात सर्वात जास्त गाजलेली लाडकी बहिण योजना अजूनही चर्चेत आहे. या लाडकी बहिण योजनेने महायुती सरकार पुन्हा सत्तेत बसवले. लाडकी बहिण योजनेचा एप्रिलचा हप्ता लाभार्थी महिलेंच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांनी त्यांच्या अकाऊंटचे पैसे चेक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज व उद्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. आता मे महिन्याचा हप्ता कधी येईल, याची चर्चा सुरु झाली आहे.

Ladki Bahin Yojana April installment

एप्रिलचा हप्ता आला

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात आजपासून एप्रिल महिन्याचा हत्पा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. मे महिन्याची रक्कम अजून यायची बाकी आहे. त्याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र एप्रिल महिन्याची रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये जमा झाली असून ही रक्कम तुम्ही चेक करू शकता.

मे महिन्याचा हप्ता कधी येईल?

मे महिना उजाडला तरी, एप्रिल महिन्याचा हप्ता न आल्याने लाडक्या बहि‍णींमध्ये अस्वस्थता पसरली होती. अखेर एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल, असे मंत्री तटकरे यांनी ट्विट करुन सांगितले होते. परंतु या ट्विटमध्ये मे महिन्याचा हप्ता कधी दिला जाईल, याबाबत मात्र माहिती देण्यात आली नाही.

2100 रुपये कधी मिळणार?

महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केलं, आणि तेच सत्तेवर आले. आता महायुती सरकार स्थापन झालं तरी, लाडक्या बहि‍णींना आश्वासन दिलली वाढीव रक्कम देण्यात आली नाही. ही वाढीव रक्कम लवकरच देऊ, एवढंच फक्त आश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे ही वाढीव रक्कम कधी मिळेल, हा सवाल विचारला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+