मुंबई उच्च न्यायालयाने कुणाल कामराच्या अटकेला दिली स्थगिती, पण पोलिसांनी दिली 'ही' परवानगी
Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका कार्यक्रमात गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'गद्दार' असे संबोधून जोरदार टीका केली होती. या आरोपाखाली मुंबईत विविध पोलिस ठाण्यात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, अटकेची भीती असलेला कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलास दिला आहे.
न्यायालयाने काय आदेश दिलेत?
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले, त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. परंतु, कोर्टाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याची परवानगी देखील दिली आहे.

खंडपीठाने आदेशात काय म्हटले?
कुणाल कामराने आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून मुंबई उच्च न्यायलायात याचिका दाखल केली होती. कुणाल कामरा यांची याचिका मान्य करताना, खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, याचिकाकर्त्याला "एफआयआर अंतर्गत कार्यवाही प्रलंबित होईपर्यंत अटक केली जाणार नाही. तथापि, न्यायालयाने असेही म्हटले आहे की तपास कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे चालू ठेवता येईल.
हे ही वाचा : कुणाल कामराच्या पोस्टमुळे पुन्हा वाद वाढणार; म्हणाला- लोकशाही पद्धतीने कलाकाराची कशी होतेय हत्या?
चेन्नईतील स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी
न्यायालयाने आदेशात पुढे असेही सांगितले की, जर तपास यंत्रणेला कुणाल कामराचा जबाब नोंदवायचा असेल तर ते चेन्नईतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने करू शकतात. कारण याचिकाकर्ता तिथेच राहतो, असेही न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेत.
हे ही वाचा : गद्दार..म्हणत कुणाल कामरांची एकनाथ शिंदेंवर टिप्पणी; FIR नोंद, नरेश मस्के म्हणाले- देश सोडावा लागेल!
आरोपपत्र दाखल केले तरी कारवाई करता येणार नाही
महत्त्वाची बाब म्हणजे, न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, जर याचिका प्रलंबित असताना आरोपपत्र दाखल केले गेले, तर ट्रायल कोर्ट याचिकाकर्त्याविरुद्ध पुढे कारवाई करणार नाही. यामुळे याचिकेच्या सुनावणीदरम्यान कुणाल कामरा यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी खात्री यातून दिसून येत आहे.
हे ही वाचा : प्रकाश राज यांनी जखमेवर चोळले मीठ; कुणाल कामरासोबतचा फोटो केला शेअर, म्हणाले- तामिळनाडु कैसे आणे का?
कामराच्या आई-वडिलांची केली होती चौकशी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या कुणाल कामरा यास अटक करण्यासाठी मुंबई पोलीस आग्रही होते. कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी दोन वेळा जबाब नोंदवण्यासाठी समन्सही बजावले होते.
मात्र दोन्ही वेळा कुणाल कामरा हा चौकशीसाठी हजर राहिला नाही. यानंतर मुंबईच्या खार पोलिसांनी कुणाल कामरा याच्या घरी जात त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली होती. त्यानंतर देखील कुणाल कामरा हा पोलिसांच्या चौकशीसाठी गेला नव्हता.












Click it and Unblock the Notifications