प्रकाश राज यांनी जखमेवर चोळले मीठ; कुणाल कामरासोबतचा फोटो केला शेअर, म्हणाले- तामिळनाडु कैसे आणे का?
Prakash Raj shares photo with Kunal Kamra : अभिनेता प्रकाश राज यांनी नुकतीच कॉमेडियन कुणाल कामरा यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली आहे. दरम्यान, प्रकाश राज यांनी कुणाल कामरासोबतचा फोटो शेअर केला. त्यात ते आनंदी दिसत आहे.
तर विशेष म्हणजे प्रकाश राज यांनी फोटोला जे कॅप्शन दिले, त्यावरुन पुन्हा एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. नेमके प्रकाश राज यांनी काय कॅप्शन दिले अन् पुन्हा वाद कसा पेटू शकतो, यावर आपण नजर टाकूया..!

प्रकाश राज यांनी फोटो शेअर केला
अभिनेता प्रकाश राज यांनी नुकताच कुणाल कामरासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यात त्यांनी कॅप्शन लिहिले की, "तामिळनाडू कैसे पहुचनेका भाई..?? सिंपल है... ऑटो में "
कॅप्शनमध्ये एका लीक झालेल्या ऑडिओ क्लिपचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये शिवसेनेचा एक पदाधिकारी विनोदी कलाकाराला धमकी देताना ऐकू येत आहे. त्यावरुन हे कॅप्शन त्याला अतिशय भेदक व मारक आहे.
Tamilnadu kaise pahunchneka bhai ..?? Simple .. Auto mein @kunalkamra88 #justasking pic.twitter.com/3sLW7SA4k2
— Prakash Raj (@prakashraaj) April 11, 2025
व्हायरल व्हिडिओतून कुणाल कामरांना दिली होती धमकी?
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये, शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता कामरा यांना शिवीगाळ करताना आणि त्यांना इशारा देताना दिसत आहे की त्यांना शिंदे यांच्यावर ज्या स्टुडिओमध्ये त्यांनी अलीकडील व्हिडिओ चित्रित केला होता त्याच स्टुडिओला सामोरे जावे लागेल. "तू जिधर मिलेगा ना भ***के, तेरा भी वही हाल होगा," असा आवाज उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे.
ज्याला कॉलरने विचारले, "किधर आने का?", ज्यावर कामरा यांनी तामिळनाडू आजा असे उत्तर दिले. त्यावर गोंधळलेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी "अभी तमिळनाडू कैसे पहेंगेगा भाई" असे म्हटले, ही क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली.
शिंदे सैनिक: तूने CM साहब के बारे में क्या बोला?
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) March 24, 2025
कुणाल: वो CM नहीं डिप्टी CM हैं
शिंदे सैनिक: किधर रहता है तू?
कुणाल: तमिलनाडु
शिंदे सैनिक: किधर आने का?
कुणाल: तमिलनाडु
शिवसैनिक: अभी तमिलनाडु कैसे पहुंचेगा भाई?
ग़ज़ब कॉमेडी चल रही है भाई 🤣😂🤣 pic.twitter.com/EccQkrIZ4a
कुणाल कामराचा नेमका वाद काय?, शिंदेंवर काय केली टीका?
कुणाल कामराने 'दिल तो पागल है' या चित्रपटातील एका गाण्याचे विडंबनात्मक रूप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केल्यानंतर हे घडले. या कृत्याला तीव्र प्रतिसाद मिळाला, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. काही दिवसांनंतर, बीएमसीने कार्यक्रमस्थळाचे काही भाग पाडण्यास सुरुवात केली.
त्यानंतर कुणाल कामरा याने ट्विटरवर एक पोस्ट करून सांगितले होते की, नेत्यांची थट्टा करणे कायद्याच्या विरोधात नाही. "एका शक्तिशाली सार्वजनिक व्यक्तीच्या खर्चावर विनोद स्वीकारण्यास तुम्ही असमर्थ असल्याने माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही," असे त्यांच्या विधानावर कामराने स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून 24 मार्च रोजी एफआयआर नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांनी कामराला दोन समन्स पाठवले आहेत. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण आता कोर्टात सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications