Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुणाल कामराच्या पोस्टमुळे पुन्हा वाद वाढणार; म्हणाला- लोकशाही पद्धतीने कलाकाराची कशी होतेय हत्या?

Kunal Kamra new Post Viral : प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गाणं रचलं. या गाण्यातून त्याने विडंबना केली. त्या गाण्यात कुठेही शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार असा उल्लेख केला. तसंच जे वर्णन केलं होतं ते एकनाथ शिंदेंच्या जीवनाशी होते.

त्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले. त्यानंतर कामरा ज्या ठिकाणी शो करत असे तो स्टुडिओ तोडून टाकला, त्यानंतर कामरावर गुन्हा दाखल झाला. आणि राज्यात आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले. आता कुणाल कामराची आणखी एक नवीन पोस्ट समोर आली आहे. त्यात त्याने लोकशाही पद्धतीने कशी कलाकारांची हत्या केली जात आहे, यावर भाष्य केले.

kunal kamra

कुणाल कामराच्या गाण्यानंतर महाराष्ट्रात काय घडलं?

  • कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचल्यानंतर कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये हा शो केला तिथे तोडफोड करण्यात आली. त्यानंतर कुणाल कामराच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराने केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचे सांगून कारवाईचा इशारा दिला. अधिवेशनातही कुणाल कामराचा विषय गाजला.
  • दरम्यान ठाकरे गटाने कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? असा सवाल करत कुणाल कामराला पाठिंबाच दर्शवला. तर त्यावरुनही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहण्यास मिळाला.
  • कुणाल कामराला पोलिसांनी दोनदा समन्स बजावलं. मात्र कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिला नाही. आता कुणाल कामराने एक पोस्ट लिहिली आहे. लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची याबाबत ही पोस्ट आहे.

काय आहे कुणाल कामराच्या ट्विटर पोस्टमध्ये, वाचा सविस्तर!

लोकशाही पद्धतीने एखाद्या कलाकाराची क्रमा-क्रमाने कशी हत्या करायची?

  • संताप अशा पद्धतीने आणि इतका प्रचंड व्यक्त करायचा की तो अनेक ब्रांड्सना काम करताना अडचण झाली पाहिजे.
  • त्यानंतर संताप आणि निषेधाचं प्रमाण आणखी वाढवायचं जेणेकरुन संस्थात्मक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम करण्याआधी कलाकाराला दहादा विचार करावा लागेल.
  • संतापाचं आणि निषेधाचं, आरडा ओरडा करण्याचं प्रमाण इतकं वाढवा की मोठी हॉटेल्स, स्टुडिओ तुमचा कार्यक्रम घेण्याची रिस्क घ्यायला नको.
  • संतापाला आता हिंसेचं रुप द्या, म्हणजे छोट्या छोट्या जागा, स्टुडिओ हेदेखील दहशतीने त्यांची दारं बंद करतील.
  • स्टँड अप कॉमेडीसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना समन्स धाडा, असं केल्याने कलाकाराचा मंच हा एखादा क्राईम सीन होऊन जाईल.
  • अन् हे सगळं केलं की, कलाकाराकडे फक्त दोन पर्याय उरतात. पहिला पर्याय म्हणजे आपला आत्मा विकायचा आणि त्यांच्या हातचं बाहुलं व्हायचं किंवा दुसरा पर्याय शांत बसायचं. मी सांगतोय हे एखादं प्लेबुक नाही. तर राजकीय हत्यार आहे ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने पद्धतशीर हत्या करता येते.

कुणाल कामराच्या नव्या पोस्टने आता काय वाद उफाळणार!

कुणाल कामराच्या या पोस्टवरुन काय पडसाद उमटणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. कुणाल कामराने सगळ्या प्रकरणावरुन मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याला न्यायालयाने दिलासा दिला होता.

दरम्यान कुणाल कामराने जो वाद झाला त्यावरुन माफी मागणार नाही अशी भूमिका आधीच घेतली आहे. त्यासंदर्भातली त्याची पोस्टही व्हायरल केली होती. त्यानंतर आज पुन्हा पोस्ट करून कलाकाराची कशी लोकशाही पद्धतीने हत्या केली जाते, याचे वर्णन केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+