Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहित पवारांनी पुन्हा राखला कर्जत जामखेडचा गड; भाजपचे राम शिंदे पराभूत

Maharashtra Assembly Election 2024- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्या येथे थेट लढत झाली. या लढतीत विद्यमान आ. रोहित पवारांनी 1243 मतांनी निसटता विजय मिळवला. संध्याकाळी उशिरापर्यंत या मतदारसंघात चुरस सुरू होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता ताणली गेली होती.

Rohit Pawar

पवारांनी भाजपचा बालेकिल्ला हिसकावला

भाजपचा गेल्या 25 वर्षांपासून बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात गेल्यावेळी रोहित पवारांनी हिसकावली होता. 2014 ते 2019 या शिवसेना-भाजप युतीच्या काळात त्यांनी मंत्री म्हणून देखील काम केले होते. 2019 साली शरद पवार यांनी या मतदारसंघात आपले नातू रोहित पवार यांना रिंगणात उतरवले. कर्जत जामखेड मध्ये असलेल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून रोहित पवार यांनी या मतदारसंघात मोठे काम उभे केले होते. दुष्काळग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे ते मतदारसंघात घराघरात पोहोचले. 2019 मध्ये त्यांचा विजय झाला.

रोहित पवारांची महाराष्ट्रभर चर्चा

गेल्यावर्षी अजित पवारांनी राष्ट्रवादीची दोन शकले पाडली. सुमारे चाळीस आमदारांसह ते महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हा शरद पवार यांची पाठराखण करण्यात आणि अजित दादा पवार यांच्यावर थेट टीका करण्यात देखील रोहित पवार यांनीच पुढाकार घेतला होता. एकनाथ शिंदे यांच्या सरकारला रोहित पवार यांनी सभागृहात आणि सभागृहावर चांगलेच धारेवर धरले होते. समाज माध्यमांचा देखील पुरेपूर वापर रोहित पवार करीत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे अगदी पहिल्याच टर्ममध्ये रोहित पवार हे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड या बिनीच्या नेत्यांच्या रांगेत जाऊन बसले होते.

शेवटपर्यंत रंगली मतमोजणी

कर्जत जामखेड लढवण्यासाठी राम शिंदे यांनी पूर्ण तयारी केली होती. 2019 च्या पराभवानंतर काहीसे विजनवासात गेलेल्या राम शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्या राजकारणाला भाजपने संजीवनी दिली. निवडणुकीच्या ऐन तोंडावर रोहित पवार यांचे मोहरे गळाले. स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा देखील या निवडणुकीत विशेष चर्चेत होता. अजित पवार यांनी राम शिंदे यांच्या विजयासाठी ताकद लावली होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ही लढत अखेरपर्यंत रंगतदार झाली. दोन्ही उमेदवारांनी लाखांचा टप्पा ओलांडला. काहीशे मतांच्या फरकाने पारडे वरखाली होत होते. फेर मोजणी देखील घेण्यात आली. अखेरीस 1243 मतांनी रोहित पवारांना विजयी घोषित करण्यात आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+