Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवार- रोहित पवारांमध्ये 'मिलीभगत'; कर्जत-जामखेडच्या निकालानंतर राम शिंदेंचा मोठा आरोप

Ram Shinde's allegation- विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले असले तरी, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा पराभव झाला. तेथे भाजपकडून विधान परिषदेचे आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्यात लढत झाली. त्यात आ. राम शिंदे यांचा फक्त बाराशे मताने पराभव झाला. आता राम शिंदे यांनी आपल्या पराभवाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना जबाबदार धरले आहे. पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता, त्याचा बळी मी ठरलो, असं म्हणत राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. राम शिंदे यांच्या आरोपावरुन एकच खळबळ उडाली आहे.

Rohit Pawar

काय आहे राम शिंदे यांचा आरोप

कर्जत जामखेडमध्ये भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा केवळ 1243 मतांनी पराभव झाला. पवार कुटुंबातील रोहित पवार या मतदार संघात विजयी झाले. आपल्या मतदारसंघात युतीचा धर्म पाळला गेला नाही. माझा बळी दिला गेला असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. ते म्हणाले, अजितदादा आज बोलले की मी सभेला आलो असतो तर तुझे (रोहित पवार) काय झाले असते हे उघड झाले आहे. रोहित पवार यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला नाही. त्याबदल्यात अजित पवारही कर्जत-जामखेडला सभेला आले नाही. रोहित पवार बारामतीमध्ये येऊ नये आणि अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये येऊ नये, असा पवार कुटुंबात अघोषीत करार झाला होता. त्यामुळे खूप कमी मताच्या फरकाने मी पडलो. मी कटाचा बळी ठरलो आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला.

महायुतीबाबत राम शिंदे यांनी नाराजी

राम शिंदे म्हणाले, महायुतीच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित होणे, हे महायुतीसाठी हे चांगले नाही. या मतदारसंघाची फेरमतमोजणी करण्याचा अर्ज मी केला होता. पण तो फेटाळला गेला. मी जिल्हाधिकाऱ्यांककडे अपील करणार आहे. माझ्यासमोर मोठी बलाढ्य शक्ती होती. महायुतीच्या लोकांबरोबर असे होत असेल तर बरोबर नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले. अजित पवार यांच्याच वक्तव्यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे. राम शिंदे यांनी अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप केल्याने चर्चा वाढल्या आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार

कराडमधील प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झाले असते. त्यावर रोहित पवार म्हणाले, तुमची सभा झाली असती, तर निकाल वर-खाली झाला असता. या दोघांच्या वक्तव्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरु झाली. राम शिंदे यांनीही याच वक्तव्याचा आधार घेत, नाराजी व्यक्त केली. कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मते मिळाली. तर राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. राम शिंदे यांचा फक्त 1243 मतांनी पराभव झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+