हसन मुश्रीफ विजयाची दुसरी हॅट्ट्रिक करणार की समरजित घाडगे बाजी मारणार? वाचा कागलचा ग्राउंड रिपोर्ट
Kagal Assembly election 2024 Hasan Mushrif vs Samarjit Ghatge contest : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाला नेहमीच प्रचंड राजकीय महत्त्व मिळाले आहे. यंदाही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) समरजित घाटगे यांच्यात जोरदार लढत होणार आहे. शिवसेना आणि स्थानिक राजकीय गटांच्या भूमिकेमुळे ही लढत आणखी चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. यात मुश्रीफ विजयाची दुसरी हॅट्ट्रिक करणार का, की घाडगे त्यांचा विजयाचा वारू रोखणार, याकडे लक्ष लागले आहे.

हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची ही दुसरी थेट लढत असली तरी दोघांचे राजकीय पक्ष बदलल्याने या लढतीत वेगळे वळण आले आहे. हसन मुश्रीफ, शरद पवारांच्या गटातून अजित पवार गटात गेले आहेत, तर समरजित घाटगे यांनी भाजप सोडून शरद पवार गटाची साथ धरली आहे.
गेल्या निवडणुकीत मुश्रीफ यांचा विजय आणि घाटगे यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र घाटगे हे नव्या पद्धतीने, उच्चशिक्षित नेतृत्वाचा दावा करत, मतदारांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची लढत ही केवळ दोन नेत्यांची नाही तर दोन राजकीय विचारसरणींची चुरस ठरेल. कोणाच्या मुद्द्यांना मतदार मान्यता देतील, हे निकालावरूनच स्पष्ट होईल. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे.
महत्त्वाचे मुद्दे
1. ईडी कारवाईचा प्रभाव
हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे त्यांची प्रतिमा धडाडीच्या नेतृत्वापेक्षा पलायनवादी नेत्याची असल्याचा मुद्दा घाटगे उचलून धरत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून मुश्रीफ बंद पडलेल्या कारखान्यांचा मुद्दा पुढे करत आहेत.

2. गडहिंग्लज कारखान्याचा वाद
गडहिंग्लज कारखाना हा वादाचा कळीचा मुद्दा ठरला आहे. स्वाती कोरी यांनी मुश्रीफ यांच्यावर कारखाना हडप केल्याचा आरोप केला आहे, तर मुश्रीफ यांनी कारखाना सुरु करून शेतकऱ्यांना आणि कामगारांना दिलासा दिल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा : रविंद्र धंगेकर इज बॅक! हेमंत रासनेंनीही दाखवलाय दम; कसब्यात तिरंगी लढत रंगणार, कोण विजयी होणार? वाचा
3. लोकसभा निवडणुकीचे पडसाद
संजय मंडलिक यांच्या पराभवाचा मुद्दा घाटगे समर्थक उचलत असून, महायुतीतील फूट अधोरेखित करत आहेत. दुसरीकडे, मंडलिक गट आणि मुश्रीफ यांचे मतभेदही प्रचारादरम्यान उघड झाले आहेत.
राजकीय आकडेवारीचा अभ्यास
2019च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी 1,16,436 मते मिळवून विजय मिळवला होता, तर घाटगे यांना 88,303 मते मिळाली होती. यावेळी नव्या समीकरणांमुळे ही आकडेवारी कशी बदलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हे आहेत मुद्दे
यंदाची निवडणूक ही विकासकामे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आधारित राहील. शिवाय, कारखान्याच्या वादामुळे मतदारांचे लक्ष तिकडेही वळेल.
हेही वाचा : गेल्यावेळी भाजपने तिकीट कापले, यावेळी चंद्रशेखर बावनकुळे निवडून येणार का, जाणून घ्या ग्राउंड रिपोर्ट
जमेच्या बाजू
- हसन मुश्रीफ : विकासकामांचा मुद्दा, माजी सहकारी संजय घाटगे यांचे समर्थन.
- समरजित घाटगे : युवा मतदारांवर प्रभाव, उच्चशिक्षित नेतृत्वाची प्रतिमा.
- मंडलिक गट : प्रचारात भूमिका अस्पष्ट, परंतु प्रभाव नाकारता येणार नाही.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications