रविंद्र धंगेकर इज बॅक! हेमंत रासनेंनीही दाखवलाय दम; कसब्यात तिरंगी लढत रंगणार, कोण विजयी होणार? वाचा
Pune Kasba Peth Election 2024 Ravindra Dhangekar vs Hemant Rasne : भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ, गेल्यावेळी काँग्रेसने आश्चर्यकारकरित्या जिंकला. 2023 मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळवला होता. आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही हेच दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. मनसेने गणेश भोकरे यांना निवडणुकीत उतरवून तिरंगी लढत करत रंगत आणली आहे.
हू इज धंगेकर..?
कसबा पेठ मतदारसंघावर सलग 28 वर्षे भाजपचा झेंडा होता. 1995 पासून 2019 पर्यंत भाजपचे गिरीश बापट आणि 2019 पासून भाजपच्या मुक्ता टिळक येथे आमदार होत्या. परंतु 2023 मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या निवडणुकीत पोटनिवडणूक लागली. भाजपनं हेमंत रासने व काँग्रेसनं माजी नगरसेवक रवींद्र धंगेकरांवर डाव खेळला. चंद्रकांत पाटलांच्या हू इज धंगेकरनं, बाजी पलटवली आणि धंगेकर निवडून आले.

यावेळी तिरंगी लढत
गेल्यावेळी होते तेच म्हणजेच भाजपकडून हेमंत रासने व काँग्रेसकडून विद्यमान आ. रवींद्र धंगेकर यंदा कसब्यातून निवडणूक लढवत आहेत. मनसेने गणेश भोकरे यांना उतरवत तिरंगी लढत केली आहे. भोकरे यांच्यामागे तरुणांची मोठी फौज दिसते. एकीकडे भाजपचा परंपरागत मतदार, दुसरकीकडे आ. धंगेकरांची क्रेझ आणि तिसरीकडे भाकरेंची युवा पलटन यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे.
लोकसभेला धंगेकरांचं गणित बिघडलं
धंगेकर लोकसभेलाही उभे होते. त्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना कसबा मतदारसंघानं 11 हजारांनी निवडून दिलं होतं. मात्र लोकसभेला गणित फिरलं. हेमंत रासने यांनी भाजपच्या उमेदवाराला तब्बल 15 हजारांचं लीड येथून दिलं. धंगेकरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जातेय.हेमंत रासनेंनी सध्या ग्राऊंडवर जात भाजपची हवा केलीय. दुसरीकडे 24 तास उपलब्ध असा कित्ता धंगेकरांनी कायम ठेवलाय. महाआरोग्य अभियान, लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबवून रासनेंनी पुन्हा दम दाखवून दिलाय.
पारंपारीक मतदार ठरणार महत्त्वाचा
या मतदारसंघात तिरंगी लढत होत असल्याने सगळ्याच उमेदवारांची गणिते चुकणार आहेत. मुख्य लढत ही धंगेकर-रासने यांच्यात असली तरी, भाकरे नेमकी कुणाची वोटबँक फोडतात, यावर विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत. भाजपचे पारंपारीक मतदार विरोधात धंगेकरांचे मविआचे मतदार विरोधात भाकरेंची युवा पलटन अशी लढाई होणार आहे. काहीही असलं तरी मविआ आणि महायुतीचा पारंपारिक मतदारच या मतदारसंघाच गणित जुळवणार आहे, असे दिसत आहे.













Click it and Unblock the Notifications