Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रात हे चाललंय काय! मुलीची छेड, वडिलांनी विरोध करताच वाळू तस्करानं बेदम मारलं, या शहरात थरार

महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्याकांड झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी देखील एका माजी सरपंचाचा मुंडकं नसलेला मृतदेह आढळून आला. दुसरीकडे पुण्यात बलात्काराच्या घटना समोर आलेल्या आहेत. अशातच, महाराष्ट्रातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या पित्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबियाला वाळू तस्करांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय काय, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Jalna Crime News

काय घडली जालना शहरात नेमकी घटना?

मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे शेजारी राहणाऱ्या तरुणासह वाळू तस्करी करणाऱ्या त्याच्या साथीदारांकडून मुलीच्या वडिलांना आणि घरातील इतर सदस्यांना मारहाण करण्यात आली. जालना शहरातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी या ठिकाणी ही घटना घडली. मुलीसह तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेने जानला शहरं हादरलं आहे.

Jalna Crime News

नऊ जणांविरोधात चंदनझीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

दुसरीकडे, मुलीच्या वडिलांकडून दिलेल्या तक्रारीनुसार नऊ आरोपींविरोधात रात्री उशिरा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक देखील केली आहे. आरोपी विरोधात चंदंनजिरा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वाळू तस्करातील दोन आरोपींना अटक!

याप्रकरणी पोलिसांनी वाळू तस्करीतील आरोपी असलेल्या सचिन पठाडे आणि गणेश काकडे या दोन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपी फरार आहेत. मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधा मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+