Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इराण-इस्रायल युद्धामुळे पुण्यातील 84 विद्यार्थी अडकले; पालकांमध्ये चिंता; डीन म्हणाले-सर्व सुरक्षित

Iran-Israel War Impact : पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. या युद्धाचा थेट फटका पिंपरी-चिंचवडमधील 'इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज' च्या 84 विद्यार्थ्यांना बसला असून, हवाई वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे हे सर्व विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडले आहेत. दरम्यान, या कॉलेजचे डीन यांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

Iran-Israel War Impact

शैक्षणिक दौऱ्यावर असताना ओढवले संकट

इंदिरा इन्स्टिट्यूटचे हे विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक प्रदर्शनासाठी (Educational Tour) दुबईला गेले होते. आपला अभ्यास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून हे सर्व विद्यार्थी रविवारी रात्री भारतात परतणार होते. मात्र, त्याच वेळी इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव दुबईतील हवाई क्षेत्र (Airspace) तात्पुरते बंद करण्यात आले. परिणामी, या विद्यार्थ्यांची विमान उड्डाणे रद्द झाली आहेत.

दुबईत युद्धाचे सावट आणि तणाव

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने केवळ लष्करी तळांनाच नव्हे, तर दुबईतील काही महत्त्वाच्या परिसरांनाही लक्ष्य केल्याचे वृत्त समोर आले आहे.

इराणकडून झालेल्या या अनपेक्षित हल्ल्यांमुळे दुबईत सध्या भीती आणि प्रचंड तणावाचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने अनेक उड्डाणे स्थगित केली आहेत, ज्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर आणि हॉटेल्समध्ये अडकले आहेत.

42 मुले आणि 42 मुलींचा समावेश: डीन यांची माहिती

या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना 'इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज'चे डीन डॉ. जनार्दन पवार यांनी सांगितले की, आमचे एकूण ८४ एमबीए विद्यार्थी दुबईत आहेत, ज्यात ४२ मुले आणि ४२ मुलींचा समावेश आहे. गेल्या ४२ वर्षांपासून आम्ही विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक दौऱ्यांवर नेत आहोत, मात्र अशी परिस्थिती पहिल्यांदाच ओढवली आहे. सुदैवाने, सर्व विद्यार्थी सध्या त्यांच्या हॉटेलमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या संपर्कात आहोत."

परराष्ट्र मंत्रालयाकडून मदतीची अपेक्षा

विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी संस्था प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत. डॉ. पवार यांनी स्पष्ट केले की, ते भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी (MEA) सतत संपर्कात असून, हवाई वाहतूक पुन्हा सुरू होताच विद्यार्थ्यांना प्राधान्याने भारतात आणण्याचे नियोजन केले जात आहे.

पालकांची धाकधूक वाढली

पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. टीव्हीवर येणाऱ्या युद्धाच्या बातम्या आणि दुबईतील तणावामुळे पालक धास्तावले आहेत. दरम्यान, कॉलेज प्रशासनाने पालकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून, मुले सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला. तर दुसरीकडे शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्रायल आणि अमेरिकेने इराणी राष्ट्रपती भवनासह अनेक ठिकाणी हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील, तेल अवीवमधील आणि इस्रायलमधील इतर ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यात 85 शाळकरी मुलींचाही समावेश आहे.

दरम्यान, इस्रायली हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि अनेक आयआरजीसी कमांडर मारले गेल्याचे दावेही केले जात आहेत. इस्रायलने म्हटले आहे की, इराणी राजवट उलथवून टाकण्याच्या उद्देशाने केलेल्या या कारवाईची तारीख काही आठवडे आधीच निश्चित करण्यात आली होती.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+