Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT उभारणार, प्रकल्पासाठी 400 कोटीचा खर्च, पंतप्रधान मोदी करणार उदघाटन

मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIT) च्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT) ची स्थापना होणार असल्याची घोषणा नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पासाठी 400 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन होणार असल्याची माहीती आहे. या संस्थेच्या माध्यमातून रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्याचा सरकारचा मानस आहे. ही संस्था मुंबईतील शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्राला नवीन दिशा देईल, अशी अपेक्षा आहे.

iict mumbai


फोटो सौजन्य- @CMOMaharashtra

मुंबईत 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी'ची उभारणी

महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक केंद्रामध्ये 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी' (IICT) ची स्थापन करण्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून याबाबत, केंद्र शासन 400 कोटी रुपयांची आर्थिक सहायता देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल," मुंबईत उभारले जाणारे IICT केवळ एक शिक्षण संस्था नसून हे संपूर्ण क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवीन दिशा देणारे केंद्र बनेल. "ही संस्था नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून भारताला जागतिक पातळीवर नेईल," महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सर्जनशील तंत्रज्ञानाला नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले होते.

राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे- देवेंद्र फडणवीस

दिल्ली येथे झालेल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज-2025) पहिल्या सत्रात सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितले होते. या जागतिक परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करण्याचा अधिकार महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.

ही भव्य परिषद 1 ते 4 मे 2025 दरम्यान जिओ कन्व्हेन्शन सेंटर मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी 130 देशांमधील मीडिया, मनोरंजन, चित्रपट आणि संस्कृतीशी संबंधित लोक मुंबईत येणार आहेत.

IICT - जागतिक दर्जाची क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, ही संस्था केवळ चित्रपट निर्मिती पुरती मर्यादित न राहता, डिजिटल कंटेंट, (व्ही.एफ. एक्स) VFX, अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब 3.0 तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल." मुंबईतील IIT बॉम्बेप्रमाणेच ही संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी देशातील सर्वोत्तम केंद्र बनेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे जागा निश्चित केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुंबईतील एका मेट्रो मार्गाचेही उद्घाटन होणार

शिखर परिषदेला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी त्याच दिवशी मुंबई मेट्रो मार्गाचे आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+