Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार योजनेचा हप्ता, पैसे बँक खात्यात जमा झाले की नाही? कसे तपासायचे वाचा

How to check the installment of Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या हप्ता राज्य सरकार लवकरच देणार आहे. राखीपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर (त्याआधीच) खात्यात पैसे जमा होतील हे नक्कीच आहे. पण यंदा जुलैसोबत ऑगस्ट महिन्याचा हप्ता राखीपौर्णिमनिमित्त मिळू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णी आणि भावांचा रक्षाबंधन सण गोड होणार आहे.

Ladki Bahin Yojana

जुलैचे पैसे कधी मिळणार?

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ लाडकी बहिण योजना सुरु झाली आहे, या योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. लाडकी बहिण योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्यात २९ जून २०२४ पासून ही योजना कार्यान्वित झाली. गेल्या वर्षी २०२४ मध्ये रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता मिळाला होता. आता या योजनेचा नव्या वर्षातील तेराव्या हप्त्यांची महिलांना प्रतिक्षा आहे, हा हप्ता मिळायला थोडा उशीर होऊ शकतो त्याला प्रमुख कारण म्हणजे रक्षाबंधनाचा मुहूर्त .. कारण गेल्या वर्षी याच दिवशी पहिला हप्ता सरकारने लाभार्थ्यांना दिला होता, आताही हाच मुहूर्त राहू शकतो.

खात्यात पैसे आले की नाही हे कसे समजायचे?

जुलै सरत आला पण लाडक्या बहि‍णींना पैसे अजून मिळाले नाहीत. अनेक लाडक्या बहि‍णींना खात्यात पैसे आले की नाही हेच समजत नाही. लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे आले हे समजायचे आले तर ते कसे तपासायचे हेही समजत नाही तसेच हे तपासण्यासाठी कुठे मदत घ्यावी हा प्रश्न लाभार्थ्यांनी पडतो. त्यामुळेच आम्ही लाडकी बहिण योजेनेचा बँक खात्यात हप्ता आला की नाही हे तपासण्याच्या काही पद्धती सांगत आहोत. या स्टेप्स वापरुन तुम्ही बँक खात्यात पैसा जमा झाले की, नाही हे तपासू शकता.

लाडक्या बहिणींनो.. खात्यात योजनेचे पैसे आले की नाही असे तपासा

१. 'नारी शक्ती दूत' ॲपद्वारे तपासणी:

ॲप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून "नारी शक्ती दूत" हे ॲप डाउनलोड करा. (हे ॲप महाराष्ट्र सरकारने योजनेच्या अर्जासाठी आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.)

मंजूर यादी शोधा: ॲपच्या मुख्य पानावर "मंजूर यादी" किंवा "अर्जाची स्थिती" हा पर्याय निवडा.

माहिती भरा: तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते तपासा.

२. अधिकृत पोर्टलवर तपासणी:

वेबसाइट उघडा: योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा: ladakibahin.maharashtra.gov.in

लॉगिन करा: "अर्जदार लॉगिन" पर्यायावर क्लिक करा.

माहिती प्रविष्ट करा: तुमचा मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

यादी तपासा: "मंजूर यादी" विभागात जाऊन तुमचे नाव तपासा.

३. ऑफलाइन पर्याय:

जर तुम्हाला ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवू शकता.

तपासणीसाठी आवश्यक माहिती:

ॲप किंवा पोर्टलवर यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.

अ‍ॅप आणि पोर्टलवरील मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते, त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करत रहा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+