Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवातील ढोल ताशा पथकांचा असा आहे इतिहास, जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2024 : महाराष्ट्रात मंगलकार्य असो वा सण समारंभ यात अनेक पारंपारिक वाद्ये आपल्याला पहायला मिळतात, ढोल ताशा हे ही एक पारंपारिक वाद्य या वाद्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. ढोल ताशा पथक हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन मानले जाते. वाद्यांना ऐतिहासिक महत्व देखील आहे. गणेशोत्सवात ही मोठ्या प्रमाणावर ढोल ताशा पथकांच्या संचलनाने गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. चला तर मग जाणून घेऊया ढोल ताशाच्या इतिहासाविषयी आणि गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध राज्यातील प्रमुख ढोल पथकांविषयी

ऐतिहासिक महत्व

ब्रिटिश काळात विशेष प्रसंगी निघत असलेल्या मिरवणुका ढोल ताशांच्या वाद्यांच्या गजरात निघत असत. त्यासाठी विशेष परवानगी घेतली जात असे. कालांतराने मेळे यामध्ये ध्वज, लेझीम असे खेळ सादर होत असत. काही काळानंतर बंद पडलेली ही प्रथा पुनरुज्जीवित झालेली दिसून येते.

Dhol Tasha pathak

ढोलताशा पथकांचा गणेशोत्सवातील इतिहास

लोकमान्य टिळकांनी 19व्या शतकाच्या उतरार्धात आणि 20 शतकाच्या पूर्वार्धात या उत्सवाला सार्वजनिक स्वरुपात पुढे आणले. पण गणेशोत्सवात ढोलताशा परंपरा प्रत्यक्षात 1960 च्या जवळपास सुरु झाली. पुणे शहराच्या तसेच ग्रामीण भागातील काही कलाकारांनी ढोल ताशा झांज वादनाची प्रथा सुरू ठेवली होती.

पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी या संस्थेचे संस्थापक विनायक विश्वनाथ उर्फ आप्पा पेंडसे यांनी कोंढणपूर येथील श्री. गुलाबराव कांबळे यांचे ताशावादन ऐकले आणि ते प्रभावित झाले. त्यांनी कांबळे यांना सोबतीला घेऊन शालेय विद्यार्थ्यांचे ढोल ताशा पथक सुरू केले. शहरी भागातील हे पहिले ढोल ताशा पथक होते. यानंतर पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा यांनी अशी पथके सुरू केली. यात स्व-रूपवर्धिनी, रमणबाग, नूतन मराठी विद्यालय, विमलाबाई गरवारे शाळा यांचा समावेश आहे. यानंतर विविध युवा सदस्यांनी एकत्र येऊन आपापली ढोल ताशा ध्वज पथके सुरू केली.

1965 च्या उत्सवाला युद्ध आणि दंगलींनी ग्रासले होते. या वर्षी पोलिसांची ढोलताशा आणि लेझीम पथकांवर बंदी होती. या निर्णयाला अप्पासाहेब पेंडसे यांनी आव्हान देण्याचे ठरवले आणि लक्ष्मी रोडच्या चौकात गळ्यात ताशा अडकवून उभे राहिले. जोरजोरात ताशा वाजवू लागले. ढोलाताशा मुळे तरुणांना एक प्रकारची शिस्त लागते असे आप्पासाहेबांचे म्हणणे होते. नंतर शिस्तबद्धता, आकर्षक संगीत आणि नृत्य यामुळे ढोलताशाला आदराचे स्थान मिळू लागले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+