Sai baba : अबब! गुरुपोर्णिमेला साईबाबांच्या चरणी तब्बल एवढं दान! 3 दिवसांत 3 लाख भाविकांचं दर्शन..
Gurupurnima 2025 Donation of Rs 6 crore at feet of shirdi Sai Baba : शिर्डी साई संस्थान भारतात प्रसिद्ध आहे. शिर्डीवाले साईबाबांवर भारतातील बहुसंख्य लोकांची श्रद्धा आहे. अनेकजण साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमीच रांग लावतात. साईबाबाच्या दर्शनासाठी यंदा गुरुपोर्णिमेला तब्बल तीन लाख भाविक शिर्डीत दाखल झाले होते. भाविकांनी श्री साईबाबांच्या चरणी आपला माथा ठेवून मनोभावे दर्शन घेतले.

यंदा किती पडले शिर्डीतील साईबाबाच्या चरणी दान?
शिर्डीत यंदा गुरुपोर्णिमेला अनेक भाविकांनी आपल्या साईबाबांना भेटण्यासाठी रिघ लावली होती. भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत जवळपास तीन लाख लोक केवळ तीन दिवसांत दाखल झाले होते. यातून श्री साईबाबांच्या चरणी तब्बल ६ कोटी३१ लाखांचे दान पडले अशी माहिती साई बबा संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
#WATCH | Shirdi, Maharashtra | Shri Sai Baba Sansthan Trust CEO Goraksh Gadilkar says, "Guru Purnima Utsav was celebrated from 9th July to 11th July by the Shri Sai Baba Sansthan Trust. During this three-day festival, more than three lakh devotees took darshan... A donation of Rs… pic.twitter.com/OQTYkv446I
— ANI (@ANI) July 15, 2025
काय म्हणाले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे सीईओ?
एनआयशी बोलताना, श्री साई बाबा संस्थान ट्रस्टचे सीईओ गोरक्ष गाडीलकर म्हणाले, "श्री साई बाबा संस्थान ट्रस्टने ९ जुलै ते ११ जुलै या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. या तीन दिवसांच्या उत्सवादरम्यान तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले... ६.३१ कोटी रुपयांचे देणगी मिळाली आहे.
दोन कोटी चेक, डीडीद्वारे प्राप्त
सीईओ गोरक्ष गाडीलकर म्हणाले, " या रकमेत देणगी काउंटरवर १.७ लाख रुपये, हुंडीमध्ये १.८८ लाख रुपये आणि ऑनलाइन देणगी २.०५ कोटी रुपये चेक डीडीद्वारे मिळाली आहे. आरतीसह पेड पास ५५ लाख रुपये आहे. ५.११ कोटी रुपयांचे रोख देणगी मिळाली आहे."
सोने चांदी किती?
सीईओ गोरक्ष गाडीलकर म्हणाले, "यंदा ९ ते ११ जुलै या काळात साईबाबाच्या चरणी ६६८ ग्रॅम सोने आणि ६.०७९ किलो चांदी मिळाली आहे.याशिवाय, १.८३ लाख भाविकांनी प्रसादालयात प्रसाद घेतला. दर्शनानंतर, ३४० लाख लाडूंचे प्रसादही भाविकांना वाटण्यात आले आहेत."
शिर्डीचे साईबाबा महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असून येथे अनेक भाविक आपलं गाऱ्हाणं घेऊन येतात. साईबाबांचा बराच काळ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे गेला. तिथेही सुंदर मंदिर असून साईबाबांनी तिथे आपल्या वास्तव्य काळात वापरलेली भांडी आणि इतर गोष्टींचा संग्रह आहे. महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातूनही साईबाबाच्या दर्शनासाठी जेव्हा भाविक शिर्डीत येतात, तेव्हा ते पाथरी येथेही जातात.
हेही वाचा : श्रावण महिन्याला द्या AIचा नवा सूर; कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तालावर भक्ती आणि आनंदाचा कसा घ्याल लाभ!












Click it and Unblock the Notifications