Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gulabrao patil Biography : गुलाबराव पाटील यांनी घेतली तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ, कोणते खाते मिळणार?

Gulabrao patil Biography : एकानाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा मंत्रीपदाची आज शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये अपेक्षेप्रमाणे जळगाव ग्रामीणचे आमदार आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटील यांना संधी मिळाली आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज गुलाबराव पाटील यांना मंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. साधे टपरी चालक ते राज्याचे पाणीपुरवठा मंत्री असा प्रवास करणारा असाच एक शिवसैनिक म्हणजे गुलाबराव पाटील. आता त्यांना कोणते खाते मिळणार याचीच उत्सुकता आहे.

Gulabrao patil Biography

निडर आणि शिवसेनेचा आक्रमक चेहरा

प्रचंड आक्रमकता, संघटन कौशल्य, अफाट वक्तृत्व, कोणतीही मोठी सभा एक हाती जिंकून घेण्याची हातोटी, कार्यकर्त्यांचे मोहोळ गोळा करण्याचा स्वभाव आणि कोणत्याही समस्येला आणि आव्हानाला बेडरपणे भिडण्याची तयारी ही गुलाबराव यांची वैशिष्ट्ये. शिवसेना या आक्रमक पक्षाला साजेसे असे हे आक्रमक व्यक्तिमत्व.

अशी आहे राजकीय कारकिर्द

गुलाबराव पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या गुलाबरावांनी संघटन कौशल्य व वक्तृत्वाच्या जोरावर जनमानसात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचे मूळ गाव लाडली ता. धरणगाव, जिल्हा जळगाव असून त्यांचं जन्म गाव व हल्ली राहत असलेले गाव पाळधी ता. धरणगाव, जिल्हा जळगाव आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाळधी गावात तर महाविद्यालयीन शिक्षण जळगाव शहरात झाले आहे.

ऐन तारुण्यात शिवसेनेत

गुलाबराव पाटील यांनी वयाच्या २५ व्या वर्षी पाळधी येथे शिवसेनेची शाखा उघडली. ते स्वतःच शाखा प्रमुख होते. 1991 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चाळीसगांव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये गुलाबराव पाटील यांना भाषणाची संधी मिळाली व तेथे त्यांचे भाषण खुपच प्रभावी झाले. तोच त्यांच्या कारकीर्दीचा टर्निंग पोइंत होता. शिवसेना आणि गुलाबराव पाटील हे नाते तेव्हापासून अगदी घट्ट झाले. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळाव्याला त्यांची उपस्थिती राहिलेली आहे.

हेही वाचा : जळगाव ग्रामीणमध्ये अखेर शिंदेसेनेचाच बोलबाला; गुलाबराव पाटलांनी गुलाबराव देवकरांना केले पराभूत

1992 मध्ये ते एरंडोल पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. याच काळात धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून त्यांची निवड झाली. 1995 ते 1999 या कालावधीत त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम केले. 1997 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. जिल्हा परिषद जळगांवच्या कृषी समितीच्या सभापती पदावर निवड झाली.

हेही वाचा : प्रतिक्षा संपली! भाजपकडून शपथविधीसाठी फोनकाॅल्स! आज नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी, 'हे' होणार मंत्री

1999 साली पहिल्यांदा विधानसभेत

  • 1999 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या तिकिटावर एरंडोल विधानसभा मतदार संघात विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले.
  • 1999, 2004 असे सलग विजय त्यांनी मिळविले.
  • 2010 मध्ये शिवसेना पक्षाचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
  • 2014 च्या पंचवार्षिक निवडणूकीत ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
  • जुलै 2016 मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली.
  • परभणी जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
  • 2019 मध्ये जळगाव ग्रामीण मधुन ते विजयी झाले.
  • उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदात त्यांनी पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जळगाव व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली.

मतदारसंघात अनेक विकासकामे

त्यांच्या कार्यकाळात ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या विधानसभा मतदारसंघात विकासाची आणि पायाभूत सुविधांची अनेक कामे करण्यात आली. तब्बल 132 कोटी रुपये खर्च करून भोकर येथील पूल उभारण्यात आला. 110 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला म्हसवडचा रेल्वे उड्डाणपूल हे देखील त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे.

प्रचंड पाठपुरावा करून त्यांनी धारावा ते धरणगाव या पाणीपुरवठा प्रकल्पाची पूर्तता केली. धरणगाव येथे तालुका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. गुलाबराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे सहकार्याने आपल्या मतदारसंघात तब्बल वीस हजार लाभार्थींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+