Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जळगाव ग्रामीणमध्ये अखेर शिंदेसेनेचाच बोलबाला; गुलाबराव पाटलांनी गुलाबराव देवकरांना केले पराभूत

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांसाठीही अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा 59,130 इतक्या मताधिक्याने पराभव करत, आपला गड कायम ठेवला. गुलाबराव पाटील यांना 1 लाख 42 हजार 519 मतं मिळाली आहेत.

या मतदारसंघात दोन दिग्गज नेत्यांची लढत पहावयास मिळाली. गुलाबराव पाटील हे कडवट शिवसैनिक म्हणून जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध असून त्यांनी उद्धव ठाकरे तसेच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवले आहे तर गुलाबराव देवकर हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राज्याचे नगर परिवहन मंत्री होते.

Maharashtra Assembly Election 2024

गुलाबराव पाटील यांनी सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय कार्यकर्ते सुरुवात केली. स्वतःच्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी नावलौकिक मिळवला तसेच जिल्ह्यात संघटनेची बांधणी केली. शिवसेनेच्या प्रत्येक दसरा मेळाव्याला उपस्थित असलेला कार्यकर्ता असा स्वतःचा उल्लेख ते आवर्जून करतात. 2022 साली झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडात गुलाबराव यांनी शिंदे यांना साथ दिली. शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना सांगितले होते. संजय राऊत यांच्या हटवादी भूमिकेमुळे शिवसेना फुटली असा आरोप हे गुलाबराव पाटील यांनी केला.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गुलाबराव पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली. एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या प्रत्येक आमदारावर उद्धव ठाकरे यांचा राग असणे स्वाभाविक आहे. गुलाबराव पाटील यांना उद्धव ठाकरे गटाचे नेत्यांनी वारंवार लक्ष केले. संजय राऊत यांनी जाहीर व्यासपीठावरून गुलाबराव पाटील यांना ललकारले. त्याचाही गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. एक प्रभावी वक्ते आणि धडाकेबाज शिवसैनिक म्हणून गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्यात ओळख आहे. विधिमंडळात तसेच विधिमंडळ बाहेर देखील पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्याची गुलाबराव पाटील यांची खासियत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर विधिमंडळात गुलाबराव पाटील यांनी ठासून आपली बाजू मांडली. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेने जोरदार फिल्डिंग लावली होती.

दुसरीकडे गुलाबराव देवकर हे देखील राष्ट्रवादीचे तगडे नेते आहेत. त्यांनीही राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषविले आहे. जळगाव आवास योजनेत झालेल्या घोटाळ्यात त्यांना शिक्षा झाली होती. 2014 आणि 2019 अशा दोन सलग निवडणुकात त्यांचा पराभव झाला. भ्रष्टाचाराचा आरोप शिक्षा झालेली असली तरी देवकर यांना मानणारा मोठा वर्ग जळगाव परिसरात आहे. दोन ताकदवान नेते परस्परांना भिडत असल्यामुळे आणि दोन्ही पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली असल्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+