भाजपला बंगल्यातून झोपडीपर्यंत नेणारा नेता गोपीनाथ मुंडें; आजही त्यांची क्रेझ का आहे कायम?
Birth anniversary of Gopinath Munde- भारदस्त शरिरयष्ठी.. कणखर आवाज.. आपल्या देवाने दिलेली अमोघ वत्कृत्वशैलीने... ही वैशिष्ट्ये आहेत, राजकारणातील राजहंस म्हणून ओळख असणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडेंची. ज्या मुंडेंनी महाराष्ट्रात भाजपला मोठं केलं त्या मोठ्ठ्या नेत्याची... मन जिंकणारं हृदय, सरळ स्वभाव, आणि थेट विरोधकांची फिरकी घेण्याचा स्वभाव, या गुणांमुळे मुंडे आजही अनेकांच्या स्मरणातून जात नाहीत. याच गोपीनाथ मुंडेंची आज जयंती. मुंडेंच्या आठवणीत आज त्यांचा बीड जिल्हाच काय, पण आख्खा महाराष्ट्र, आठवणींच्या सागरात आठवणींचे अमृत प्राशन करतोय. राजकारणातील गोपिनाथरावांचे किस्से, एखाद्या चित्रपटातील कथानकापेक्षा कमी नाहीत.

भाजप मुंडेंनीच घराघरात पोहोचवली
८०- ९० च्या दशकात महाराष्ट्राला भाजपला खरी ओळख कुणी करुन दिली असेल, तर ती स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. प्रमोद महाजनांनी... भाजप अगदी गावखेड्यापर्यंत नेण्याचं काम या दोघांनी केलं. गोपीनाथ पांडुरंग मुंडे, हे त्यावेळी वंचितांचेच नाही, तर आख्ख्या महाराष्ट्रातील दीन-दुबळ्यांचे नेते झाले. त्यांचा जन्म मराठवाड्यातल्या बीड जिल्हातला. सुरुवातीला आपल्या आभ्यासपूर्ण व विश्लेषणात्मक भाषणांनी ते सभा गाजवायचे. गर्दी खेचणारे वक्ते म्हणून त्यांची ओळख होती. भाजपच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय नेत्यांपर्यंत गोपिनाथरावांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.
मुंडेंनी त्या काळात पायाला भिंगरी बांधून भाजपच घराघरात रुजविण्याचे काम केले. फक्त वाण्या-बामणांचा व उच्चभ्रूंचा पक्ष अशी ओळख असलेला भाजप त्यांनी थेट उसतोड मजूर, दलीत, दीन दुबळ्यांपर्यंच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवला. सळसळता उत्साह, तत्परता, निर्णय क्षमता, निष्ठा या गोपिनाथरावांच्या जमेच्या बाजू. गोपिनाथरावांनी आपले वैयक्तीक हितसंबंध राजकारणाशिवायही जपले. त्यामुळेच सर्वच पक्षांत त्यांचे सच्चे मित्र तयार झाले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोपिनाथरावांच्या मैत्रीचे किस्से आजही ऐकविले जातात.. हे दोघे व्यासपीठावर एकत्र येणार म्हंटलं की मोठी गर्दी जमायची. त्यांच्या सभेत चिमटे, कोपरखळ्या, हास्याचे फवारे हे ठरलेले असायचे...कोण कुणाची किती खेचतो, हे प्रेक्षक कानात प्राण आणून ऐकायचा...
मुंडे यांचा राजकीय प्रवास
वयाच्या ऐन पंचविशीत १९७० मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्त्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९७८ साली बीड जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात मुंडे सहभागी झाले होते. नामांतर आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला. जनसंघापासून सुरुवात झालेल्या भाजपला मुंडेंनी राष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचे काम इमाने-इतबारे केले.
पक्षाला संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर काढून त्यांनी सर्वसमावेशक बनविले. वसंतराव भागवतांनीही त्यांना त्यावेळी साथ दिली. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. परळी विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी १९८० पासून २००९ पर्यंत प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २००९ साली त्यांना संसदेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी २००९ ते २०१४ पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. ते भाजपचे लोकसभेतील उपनेते होते. १४ मार्च १९९५ ते १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्रीही होते.
अनेकांसाठी ठरले दैवत
गोपीनाथ मुंडे हे बीडकरांसाठी दैवत होते, आजही आहेत. गोपीनाथ मुंडे म्हणतील तीच पूर्व दिशा असायची, मुंडेंच्या काळात भाजप चौकट तोडून बहुजनांमध्ये, वंचितांमध्ये रुजला. गोपीनाथ मुंडे भाजपमधील एकमेव लोकनेते होते, ज्यांच्यानावामुळेच मोठा जनसमुदाय आज ही एकत्र येऊ शकतो. मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे, मी मुंडे साहेबांच्या तालमीत वाढलोय, असं अभिमानाने सांगणारे नेते, कार्यकर्ते आजही गावागावांत आढळून येतात. एकदा संपर्कात आलेला माणूस कायमचा त्यांचा होऊन जायचा.
भाजपपासून फटकून वागणारे घटकही मुंडे यांच्या अत्यंत जवळ होते. आज जरी गोपीनाथ मुंडे हे आपल्यात नसले तरी त्यांची क्रेझ ही संपलेली नाही. गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांची मुलगी पंकजा, प्रीतम पुतण्या धनंजय यांच्याकडे त्यांचा राजकारणाचा वारसा आला. मात्र आजही सर्व मुंडे कुटुंब गोपिनाथरावांच्या विचारांवरच राजकारण करताना दिसतात. राजकारणातील मुंडे कुटुंबाचा आलेख आजही न संपणाराच आहे. गोपीनाथ रावांची वैचारीक देणगी संपूर्ण मुंडे कुटुंब आजही पुढे नेताना दिसत आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications