सावधान! गॅस सिलिंडर हवा असेल तर हा बदललेला नियम लक्षात ठेवा, नाहीतर उडेल तुमची तारांबळ
Gas Booking New Method : गॅस बुकिंग करण्यासाठी मोबाईलवर संबंधित क्रमांकावर कॉल केला जातो. त्यानंतर संबंधित एजन्सीकडून तुमच्या घरी गॅस सिलिंडर पोहच केले जाते. परंतु, यापुढे आता एलपीजी कंपनीद्वारे ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जर गॅस सिलिंडर डिलिव्हर करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओटीपी सांगितला नाही तर तुम्हाला आता सिलिंडर मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांनो सावधान, ज्या मोबाईल क्रमांकावरुन बुकिंग केली आहे, त्यावर ओटीपी घरच्यांना देखील माहिती असणे गरजेचा आहे. अन्यथा तुमची तारांबळ उडल्याशिवाय राहणार नाही. चला तर नेमकी संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया, म्हणजे तुमची तारांबळ उडणार नाही. तसेच तुम्हाला योग्य वेळी सिलिंडरची सेवा मिळेल.
आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावं. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. मात्र असे असले तरी या नव्या नियमाने ग्राहकांची चांगलीच अडचण होईल व सिलेंडर साठी वितरकांसोवत अनेकदा खटके उडू शकतील, अशी शक्यता ग्राहक हक्कचे डॉ. श्याम भूतडा व्यक्त करतात.

जुनी पद्धत नेमकी कशी?
घरगुती वापराचा सिलेंडर बुक केल्यावर काही दिवसांनंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरपोच करतात अशी सध्याची पद्धत आहे. मात्र यात आता महत्वाचा बदल होणार आहे. ओटीपीशिवाय सिलिंडरची होम डिलिव्हरी होणार नाही. यापूर्वी पण हा नियम होताच. परंतू तो आता अनिवार्य करण्यात आलेला आहे. सिलिंडर ऑनलाईन बुक केल्यावर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलेव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागेल. अन्यथा ग्राहकांना सिलिंडरपासून तुम्ही मुकणार आहात, त्यामुळे ग्राहकांनी यापुढे काळजी घेण्याची गरज आहे.
काय आहे नवीन प्रक्रिया?
एलपीजी गॅससंदर्भात एजन्सी प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅसची बुकींग केल्यानंतर तुमचं काम झालं असं मुळीच नाही. बुकींगनंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ज्यावेळी सिलिंडर डिलिव्हरी व्यक्ती घरी आला. तेव्हा त्या व्यक्तीसोबत ग्राहकांनी हा ओटीपी शेअर करणं बंधनकारक असणार आहे. ग्राहकांचा मोबाईल नंबर अपडेट नसल्यास डिलीव्हरी पर्सन अॅपच्या माध्यमातून रिअल टाईम अपडेटही करु शकणार आहे. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी त्या अॅपच्या साह्याने तुम्ही मोबाईल नंबर डिलिव्हरी बॉयच्या सहाय्यानं अपडेट करु शकाल. अॅपच्या माध्यमातून रिअल टाईम बेसिसवर मोबाईल क्रमांक अपडेट होईल. त्यानंतर त्याच क्रमांकावर कोड जनरेट करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. हा नवीन बदल आता सर्वांनी लक्षात ठेवावा व तो योग्यरित्या वापरावा.
नवीन पद्धतीन डोकेदुखी ठरणार का?
ही नवी प्रक्रिया डोकेदुखी ठरणार असल्याचे म्हटल्या जाते. कारण नोंदणी करणारा मोबाईलधारक घरी नसल्यास डिलिव्हरी बॉय सिलिंडर देणार नाही. अनेकांचे मुले घराबाहेर असतात. ते बुकिंग करीत पैसे भरून टाकतात. पण घरी जर वृद्ध आईवडिलास ओटीपी सांगता आला नाही तर सिलिंडर मिळू शकणार नाही. त्यामुळे या पद्धतीबाबत जागरूक होण्याची गरज आहे. तसेच गॅस जोडणी असणाऱ्या कुटुंबाने वितरकाकडे अधिकृत एकच नंबर नोंदवावा. कारण एका नंबरवर नोंदणी झाल्यास त्यावरून एक महिना झाल्याशिवाय दुसऱ्यावेळी सिलिंडरची देखील मागणी करता येणार नाही.












Click it and Unblock the Notifications