पुण्यात गणेश विसर्जनाच्या उत्सवाला गालबोट: चाकण परिसरात 4 युवक बुडाले, दोघांचा दुर्दैवी अंत

Ganesh Visarjan accident Pune 2025 : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी चार युवक पाण्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात दोन युवकांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Ganesh Visarjan accident Pune 2025

वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटना

पिंपरी-चिंचवडजवळील विविध ठिकाणी या घटना घडल्या आहेत:

भामा नदी, प्रियदर्शन शाळेजवळ : अभिषेक संजय भाकरे (वय २१) आणि आनंद जयस्वाल (वय २८) हे दोघे गणेश विसर्जनासाठी नदीत उतरले असताना बुडाले. आनंद जयस्वाल यांचा मृतदेह मिळाला असून, अभिषेकचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

भामा नदी, शेलपिंपळगाव : रवींद्र वासुदेव चौधरी (वय ४५) हे विसर्जनादरम्यान नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके कार्यरत आहेत.

बिरदवडी, विहीर : संदेश पोपट निकम (वय ३५) यांचा विहिरीत तोल जाऊन बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

हे ही वाचा : आनंदावर विरजण..! पुण्यात गणपती विसर्जनाला गालबोट; दोन युवकांचा बुडून मृत्यू, कसा घडला थरार!

वारंवार सूचना देऊनही निष्काळजीपणा

पोलीस प्रशासनाकडून वारंवार नदीपात्रात किंवा धोकादायक ठिकाणी विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाकडे दुर्लक्ष करत काही नागरिकांनी स्वतः पाण्यात उतरण्याचे धाडस केले. उत्साहाच्या भरात सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यानेच या दुर्दैवी घटना घडल्याचे दिसून येत आहे.

या घटनांनी पुन्हा एकदा सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर भर देण्याची गरज अधोरेखित केली आहे. प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, विसर्जन करताना नदी, विहिरी किंवा तलावात स्वतः उतरून जीव धोक्यात घालू नये.

विसर्जनासाठी सुरक्षित आणि योग्य पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात असे दुर्दैवी प्रसंग टाळता येतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+