Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आनंदावर विरजण..! पुण्यात गणपती विसर्जनाला गालबोट; दोन युवकांचा बुडून मृत्यू, कसा घडला थरार!

pune ganpati visarjan tragedy two youths drown : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्साहानंतर 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत राज्यभरात गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू होता.

पुण्यातही मानाच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र, याच उत्साहाला खेड तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने गालबोट लावले आहे.

वाकी बुद्रूक येथे गणेश विसर्जनादरम्यान दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. दरम्यान, मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.

Ganesh Visarjan 2025

मानाचे गणपती वेळेत विसर्जित

पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन वेळेत पार पडले. सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सर्वात आधी कसबा गणपतीचे सायंकाळी ३:४७ वाजता विसर्जन झाले, त्यानंतर तांबडी जोगेश्वरी गणपती (४:१० वाजता), गुरुजी तालीम गणपती (४:३५ वाजता), तुळशीबाग गणपती (४:५९ वाजता) आणि शेवटी केसरीवाडा गणपतीचे (५:३९ वाजता) विसर्जन झाले. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची शिस्त आणि उत्साहाचे नेहमीच कौतुक केले जाते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात भव्य उत्सव साजरा करत लोक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीत सहभागी होऊन बाप्पाला निरोप देत आहेत.

विसर्जनाच्या उत्साहात दुर्दैवी घटना

एकीकडे पुणे शहरात शांततेत विसर्जन सुरू असताना, दुसरीकडे खेड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली. वाकी बुद्रूक येथे गणेश विसर्जन करताना दोन तरुण बुडाले.

विसर्जन करताना उत्साहाच्या भरात किंवा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा. या घटनेने गणपती विसर्जनाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा गणपती विसर्जनादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रशासन आणि नागरिकांनीही पाण्याच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.

गोप नृत्याद्वारे गणरायांना निरोप

नंदुरबार शहरात नवयुवक लक्ष्मी नगर हमालवाडा मंडळाने यंदाही गणेश विसर्जन पारंपरिक पद्धतीने केले. या मंडळातील तरुणांनी गोप नृत्याची जुनी परंपरा जपली. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मंडळातील युवक पारंपरिक वेशभूषा करून उत्साहात गोप नृत्य करत होते.
ढोल-ताशांच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मंडळाची ही खास परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून, दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी हे खास नृत्य सादर केले जाते. या पारंपरिक नृत्याने विसर्जन सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+