Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजून का झाले नाही लालबागच्या राजाचे विसर्जन? जाणून घ्या विसर्जन का पडले लांबणीवर, काय आहेत समस्या?

Ganesh Visarjan 2025 Updates : गणेश विसर्जनानिमित्त राज्यभरात मोठा उत्साह दिसून आला असून आज ७ सप्टेंबरला दुसऱ्या दिवशीही गणेश भक्तांचा उत्साह तितकाच ओसंडून वाहत आहे, मुंबई-पुण्याचे गणपती विसर्जन अजूनही सुरुच असून खास बाब म्हणजे लालबागच्या राजाचे विसर्जन अजून झाले नसून ते लांबणीवर पडले आहे.

दुसरीकडे मुंबईत संततधार पाऊस सुरु असून लालबागच्या राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. मात्र, अद्याप लालबागच्या राजाचे विसर्जन झाले नाही. समुद्राला भरती आल्याने आणि नवीन तयार करण्यात आलेला तराफा फारच हलत असल्याने लालबागच्या राजाचे विसर्जन अजून थांबलेले आहे.

Ganesh Visarjan 2025 Updates

लाल बागच्या राजाचे विसर्जन आहोटीनंतर

लाल बागच्या राजाला विसर्जित करण्यासाठी दरवर्षी कोळी बांधवांचा तराफा घेतला जातो, पण यंदा लाल बागचा राजा गणेश मंडळाने स्वःतचा तराफा तयार केला आहे. तराफा नवीन असल्याने त्यावर भव्य मुर्ती ठेवायला अडचणी येत होत्या. या तराफ्यावर गणेश मुर्ती ठेवून समुद्रात विसर्जन केले जाणार आहे, पण विसर्जनावेळी समुद्राला भरती आल्यानंतर तराफ्यावर लालबागच्या राजाची मुर्ती दुपारी बारापर्यंत ठेवण्यात आली नव्हती. तराफा फारच हलत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.

उंच लाटा, गुजरातच्या तराफ्याची अडचण

यंदा गुजरातहून आणलेला तराफ्यावर मुर्ती ठेवण्यात अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे समुद्राला भरती आल्यानंतर लाटा ४.२ मीटर उंच उडत आहेत, त्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन थांबलेले आहे. आता भरती थांबून ओहोटी येईपर्यंत लालबागच्या राजाचे विसर्जन होणार नाही अशी शक्यता आहे सध्या कोळी बांधव हा नवीन तराफा समुद्रात काही अंतर दुरवर घेऊन गेले आहेत.

दुसऱ्या दिवशीही गणपती बाप्पांचे विसर्जन सुरुच

गणेश भक्तांचा आज विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही उत्साह ओसंडून वाहत आहे. तर मुंबईतील विसर्जन निविघ्न पार पडण्यासाठी पोलिस बंदोबस्त कडेकोट आहे. राज्यात कुठलीही अनुचित घटना घडली नसून आज दुसऱ्या दिवशीही मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे विसर्जन केले जात आहे.

हेही वाचा : Ganesh Visarjan 2025 Wishes In Marathi: गणेश विसर्जनानिमित्त खास शुभेच्छा संदेश, फोटो सर्वांना पाठवा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+