Ganesh Visarjan 2025 Wishes In Marathi: गणेश विसर्जनानिमित्त खास शुभेच्छा संदेश, फोटो सर्वांना पाठवा
Ganesh Visarjan 2025 Wishes In Marathi : गणाधीश, गणपती, गजानन, श्री गणेश, गणपती बाप्पा, वक्रतूंड अशी वेगवेगळी नावे असलेल्या बाप्पांचे 6 सप्टेंबर 2025 रोजी विसर्जन केले जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! हा जयघोष सर्वत्र कानी पडणार, काही तासांतच गणपती बाप्पांना निरोप दिला जाणार आहे.
या गणेशउत्सवात आनंदाची मायेची पखरण आपल्यावर ठेवत गणपती बाप्पा गावाला जाणार आहेत, ते येतील पुढच्या वर्षी... बाप्पांना जरी निरोप दिला जाणार असला तरीही असे मानले जाते की, ते चराचरात सामावलेले आहेत.

गणेशोत्सवाच्या या शेवटच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याचा क्षण आला आहे. आनंदाचा आणि उत्साहाचा हा दिवस, पण मनात बाप्पाला निरोप देण्याची हुरहूरही आहे. बाप्पाला निरोप देताना, चला आपण आपल्या जीवनातील सर्व दु:ख, अडचणी आणि नकारात्मकताही विसर्जित करूया आणि एक नवीन, सकारात्मक सुरुवात करूया, असा संदेश आपले मित्र, कुटुंबिय, आप्तेष्ठ, हितचिंतकांना देऊया. ज्यामुळे तुमचे मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांना आणि प्रियजनाना बाप्पांचा आशीर्वाद लाभेल आणि हा सोहळा अधिक हर्षोल्हासात साजरा होईल.

गणेश विसर्जन शुभेच्छा संदेश (Ganesh Visarjan 2025 Wishes In Marathi )
1. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! गणपती विसर्जनच्या हार्दिक शुभेच्छा!
2. बाप्पाचा निरोप घेण्याचा क्षण, पण मनात कायम आठवणी. विसर्जनच्या शुभेच्छा!

3. यावर्षी बाप्पांना निरोप देताना, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. गणेश विसर्जनच्या खूप खूप शुभेच्छा!
4. गणपती बाप्पांना निरोप देताना, तुमच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होवो.

5. तुमच्या घरी बाप्पांचे आशीर्वाद आणि भरभराट कायम राहो. गणेश विसर्जनच्या शुभेच्छा!
6. आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस, बाप्पांना निरोप देण्याचा क्षण.
7. पुढच्या वर्षी पुन्हा येण्याच्या आशेने, बाप्पांचा निरोप घेतो.
8. तुमच्या कुटुंबावर बाप्पांचे आशीर्वाद सदैव राहोत.

9. गणपती बाप्पांना निरोप देताना, तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी कायम राहो.
10. चला बाप्पांना निरोप देऊया, आणि पुढच्या वर्षी पुन्हा स्वागत करूया.
11. गणेश विसर्जनच्या या शुभ प्रसंगी, तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळो.
12. हा गणेशोत्सव तुम्हाला खूप आनंद देवो.

13. तुमच्या जीवनातील सर्व दु:ख बाप्पा दूर करो.
14. बाप्पांच्या आगमनाने तुमच्या घरात सुख-समृद्धीचा वास होवो.
15. या गणेश विसर्जनला, तुमच्या कुटुंबासाठी खूप आनंद आणि भरभराट येवो.

हेही वाचा : Ganesh chaturthi 2025 modak recipe in Marathi : बप्पांच्या आवडीचे खव्याचे मोदक असे बनवा, वाचा रेसिपी












Click it and Unblock the Notifications