Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ganesh Chaturthi 2024, Lalbagh cha raja : लालबागचा राजा का आहे इतका प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास

Ganesh Chaturthi 2024 Lalbagh cha raja : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होतो. राज्याची राजधानी मुंबईत देखील हा उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचा उत्सव हा ब्रिटिश काळापासून साजरा केला जातो.

या गणपतीला नवसाचा गणपती किंवा इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणूनही ओळखले जाते. देशात नाहीत विदेशात देखील लालबागच्या राजाचे भक्त आहेत. 'लालबागचा राजा'च्या फर्स्ट लुकचे अनावरण करून मुंबईत दरवर्षी हा गणेशोत्सव साजरा होतो.

Lalbagh cha raja


मुंबई- परळमधील लालबागचा इतिहास 1900 च्या दशकातील आहे, जेव्हा संपूर्ण परिसरात 100 पेक्षा जास्त कापड गिरण्या होत्या. या गिरण्यांमुळे हा परिसर स्थानिक पातळीवर गिरणगाव किंवा गिरण्यांचे गाव म्हणून ओळखला जात असे. 1930 च्या दशकात औद्योगिकीकरणाच्या शिखरावर, कापड उद्योगात काही मोठे बदल झाले आणि कापड गिरण्यांना त्याचा फटका सहन करावा लागला, ज्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम झाला.

नवसाला पावणारा गणपती

लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार १९३२ साली बंद झाला होता त्यांची इच्छापूर्ती होऊन मार्केट सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आले. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात लालबागच्याश्री'ची स्थापना झाली. तेव्हापासूनच या गणपतीला नवसाला पावणारा लालबागचा राजा' असे म्हटले गेले.

राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत मुर्तीची प्रतिष्ठापणा

त्याकाळात मंडळ गणपतीच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. 1946 साल गणपती सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखवण्यात आला. पुढे 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात श्री' ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. महात्मा गांधी यांची 1984 मध्ये हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यात आली.

1958 नंतर वाढली भाविकांची रिघ

इ.स. 1958 सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. 1948 ते 1968 या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रौ पानसुपारी समारंभ सुरु केले. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजही चालू आहे.

बिग बी ते स्मृती इराणी आहे भक्त

अभिनेते, नेते, उद्योगपती किंवा सामान्य जनता सर्वजण आपल्या इच्छेने लालबागच्या राजाच्या दरबारात येतात तेव्हा भक्त बाप्पाच्या चरणी नमस्ते म्हणतात, तेव्हा सामान्य आणि विशेष यातील फरक नाहीसा होतो. मुकेश अंबानीपासून शाहरुख खानपर्यंत, अमित शहांपासून स्मृती इराणींपर्यंत सगळेच बाप्पाचे भक्त आहेत. प्रत्येकजण गणपती बाप्पाला उदार मनाने दान करतो. मुंबईतील लालबाग परळ परिसरात बाप्पाच्या दर्शनाला देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात.Lalbagh cha raja

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+