Ganesh Chaturthi Celebration: गणेशोत्सवानिमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, वाचा आणि पाठवा
Ganesh Chaturthi Celebration Wishes Quotes Messages Prayers Aarti Slogans :गणेशोत्सव हा आनंदाचा, उत्साहाचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक जण गणेशभक्तीत तल्लीन होत असतो, गणेशाची मनोभावे पूजा-अर्चा करत असतात. या प्रसंगी लोक गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना पाठवतात आणि बाप्पाच्या आशीर्वादाची इच्छा प्रकट करतात.
आम्ही तुमच्यासाठी असेच काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, ते तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना, जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना पाठवू शकता. आणि त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करु शकता.

"मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!"
"तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा."
"बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छ!"
गणपती बाप्पा मोरया..
"मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!"
" बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची - गणेश चतुर्थी शुभेच्छा!"
"तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!!!"
"बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो
उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो
बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो
प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!"
"देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची, तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी
गणपती बाप्पा मोरया!!!"
"बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!"
"गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद
सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही
गणेश चतुर्थी शुभेच्छा!"
"गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया"
"कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
आहे आम्हाला सार्थ विश्वास
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!"
"अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!"
"श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली"
"श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे
आली आली गणाधीशाची स्वारी आली"
"बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुखसमृद्धी येवो
हीच गणरायच्या चरणी प्रार्थना - गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा!"
"देव येतोय माझा, आस लागली तुझ्या दर्शनाची
एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार!"
(Ganesh Chaturthi Celebration Wishes Quotes Messages Prayers Aarti Slogans)












Click it and Unblock the Notifications