Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गणपतीपुळे जागृत देवस्थान; पण गणेशोत्सवात पंचक्रोशीतील गावात का होत नाही 'श्रीं'ची प्रतिष्ठापणा? वाचा

Ganapati Pule Temple History and Significance :गणपती किंवा गणेश ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय देवता आहे. भारतासोबत जगभरातील अनेक देशांत 10 दिवस चालणारा हा गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते, आणि अनंत चतुर्दशीदिवशी गणपती विसर्जन होते.

महाराष्ट्रात अष्टविनायक मंदिरे असून याव्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध गणपतीची मंदिरे आहेत आम्ही या मालिकेत तुम्हाला राज्यातील प्रसिद्ध गणपती मंदिरांबाबत माहिती देत आहोत आज आम्ही तु्म्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिराविषयी माहिती देत आहोत. गणपतीपुळेचा इतिहास, त्याचे महत्व काय आहे याबद्दल माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

Ganapati Pule Temple History and Significance

गणपतीपुळेचा इतिहास

मुंबईपासून सुमारे 350 कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे. कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. कोकण किनारपट्टीवरील गणपतिपुळेमध्ये आकर्षक समुद्रकिनारा असून आणि गणपती मंदिरा व्यतिरिक्त गणपती पुळे मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. गणपतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे.

भारताच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आत. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. मुघलांच्या काळात आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण रहात होते. ते गावचे खोत होते. मुघलांच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. "आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन", असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.

अशी आहे कथा?

अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की, "मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरुप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल." असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सघ्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, त्यांनी तात्काळ सर्व परीसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कार्ये भिडे भटजींनी सुरु केली.

गणपती पुळे हे नाव कसे पडले?

गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवटीचा आहे. देशाच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे, त्या लगतचे गाव असून सगळ्या देवतांमध्ये आराध्यदैवत अशा गणेशाने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला. समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले, असे सांगितले जाते.

सात गावांत का होत नाही गणेश प्रतिष्ठापणा?

गणपतीपुळे येथील श्रींची मूर्ती स्वयंभू आहे त्यामुळे गावात तसेच आजुबाजूच्या सात गावांत गणेशोत्सवात गणेशमूर्तीची वेगळी प्रतिष्ठापना न करता गणपतीपुळे मंदिरातील मूर्तीची पूजा-अर्चा केली जाते. ही पंरपरा 500 वर्षांपासून सुरु असल्याचे सांगितले. जाते. गणपती पुळे मंदिरातील गणपती हा आपल्या घरातील आणलेला गणपती आहे असे इथला प्रत्येक जण मानतो. हे जागृत देवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे.(Ganapati Pule Temple History and Significance )

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+