Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची कसोटी; माजी आमदार भाऊसाहेब कांबळे रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024 : 2022 च्या जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. तब्बल 40 आमदार आणि आठ मंत्री यांचे समर्थन एकनाथ शिंदे यांना मिळाले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जवळपास अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून समर्थपणे काम पाहिले.. विकासाच्या विविध योजना एकनाथ शिंदे यांनी पूर्णत्वास नेल्या. पायाभूत सुविधांचे प्रकल्पही नेटाने पूर्ण केले. शिवसेनेचे फक्त आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले असे नाही तर विविध पक्षातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास दाखवला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अशा विविध पक्षातून नेत्यांचा ओघ एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरू झाला. निवडणुकीच्या तोंडावर परस्पर सामंजस्यातून भाजपचे अनेक नेते आणि आजी-माजी आमदार देखील एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झाले.. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील एकनाथ शिंदे आणि तोडीस तोड जागा मिळवून आपल्यालाही जनाधार असल्याचे सिद्ध करून दाखवले. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेचा लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा जास्त होता. ठाणे आणि कोकण तसेच उत्तर पश्चिम मुंबई हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे बालेकिल्ले एकनाथ शिंदे आणि उध्वस्त करून टाकले आणि तिथे आपल्या झेंडा फडकवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेले एक नेते म्हणजे भाऊसाहेब कांबळे.

Former MLA Bhausaheb Kamble

कांबळे श्रीरामपूरचे दोनवेळा आमदार

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार असलेले भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. 2009 आणि 2014 साली कांबळे यांनी श्रीरामपूर मतदारसंघ जिंकून घेतला होता. तेव्हा ते कॉंग्रेसमध्ये होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रवेशानंतर भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी बहाल केली.

प्रवरा नदीवर पुलाची उभारणी

एकनाथ शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यभरात विविध ठिकाणी पायाभूत सुविधांना गती दिली. मतदार संघ कोणाच्या वाट्याला आला आहे हे त्यांनी कधीच पाहिले नाही. त्यामुळेच त्यांच्या विकास कामांच्या धडाक्यात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देखील अनेक कामे करण्यात आली. प्रवरा ही श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाची नदी आहे. श्रीरामपूरचे अर्थकारण प्रवरा नदीच्या काठानेच वसलेले आहे. या नदीवर 12 कोटी रुपये खर्च करून लाख कान्हेगाव ते पाढेगाव असा 120 मीटर लांबीचा आणि नऊ मीटर रुंदीचा पूल उभारण्यात आला आहे. यामुळे दोन्ही काठावरील नागरिकांची मोठी सोय झाली आहे.

पासपोर्ट कार्यालयाची निर्मिती

पासपोर्ट कार्यालय हे अलीकडच्या काळात अत्यंत महत्त्वाचे कार्यालय ठरू लागले आहे. विविध कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे पण पासपोर्ट कार्यालयांची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे हे महत्त्वाचे प्रपत्र मिळविण्यात खूप कालावधी जातो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या धोरणानुसार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात पासपोर्ट कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथून विदेशात जाऊ इच्छिणाऱ्या असंख्य नागरिकांची सोय होणार आहे. श्रीरामपूर शहरात नगर नियोजन कार्यालयाची उभारणी याच वर्षात करण्यात आली आहे. हा देखील एक महत्त्वाचा प्रकल्प श्रीरामपूरकरांच्या सेवेत दाखल झाला आहे.

योग भवन उभारणी

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने तब्बल 86 खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल बोर्ड उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून खेडोपाड्यातील आणि तुलनेने कमी आर्थिक क्षमता असलेल्या कुटुंबातील मुले अत्याधुनिक शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. अलीकडच्या काळात योग विद्येचे महत्त्व वाढले असून मतदारसंघात 80 लाख रुपये खर्चून योग भवनांची उभारणी करण्यात आली आहे तसेच जागोजागी पथदिपांची उभारणीही करण्यात आली आहे. सध्या आणखी पाच योग भावनांची उभारणी प्रस्तावित असून ते काम लवकरच पूर्णत्वास नेले जाणार आहे.

अन्य योजनांची अंमलबजावणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची महत्त्वाचे योजना असून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देखील मोठ्या संख्येने महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच व्यक्तिगत लाभाच्या तसेच कृषी विषयक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून घेण्याकडे एकनाथ शिंदे यांनी भर दिला आहे त्यामुळे विविध योजनांचे लाभार्थी श्रीरामपूर मतदारसंघात अधिक आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+