माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला, देशमुख गंभीर जखमी

Attack on Anil Deshmukh : महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा प्रचार आज थंडावला. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीला गालबोट लागले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेडमधील सांगता सभा संपल्यानंतर अनिल देशमुख घरी परतत असताना हा हल्ला झाला. अनिल देशमुखांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Anil Deshmukh

नेमका कसा झाला हल्ला

अनिल देशमुखांची गाडी तीनखेडा- भिष्णूर मार्गाने परत येत होती. त्यावेळी काटोल- जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यातील एक दगड थेट गाडीच्या काचेवर लागला. हा दगड मोठा असल्याने गाडीची काच फुटून बारीक-बारीक काचा या अनिल देशमुख यांच्या डोक्यावर-तोंडावर लागल्या. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. जमखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल

अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ल्या झाल्यानंतर या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. व्हिडीओत अनिल देशमुख बसलेल्या गाडीसमोरील काचेवर एक मोठा दगड फेकल्याचे दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या डोक्याला जोरदार मार लागलेलाही दिसत आहे. डोक्यातून रक्त येताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काचे फुटली आणि त्या काचेचे तुकडे हे समोर बसलेल्या अनिल देशमुखांच्या डोक्याला मागले. घटनेनंतर अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेले आहेत.

हल्लेखोर अजूनही फरार

दरम्यान हा हल्ला नेमका कुणी केला? आणि त्यापाठीमागचं कारण काय? याबाबत अद्याप माहिती कुठलीही माहिती हाती आलेली नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी बोलताना या हल्ल्याचा निषेध केला असून या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+